Type Here to Get Search Results !

केज तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी शिवसेनेची मशाल पेटली केज तहसील कार्यालया समोर शिवसेना उबाठा गटाचे आमरण उपोषण.

केज तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी शिवसेनेची मशाल पेटली

केज तहसील कार्यालया समोर शिवसेना उबाठा गटाचे आमरण उपोषण.



केज/प्रतिनिधी


केज तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी उबाठा शिवसेनेची मशाल पेटली असून केजतहसील कार्यालयासमोर शिवसेना उबाठा गटाचे आमरण उपोषण चालू झाले आहे. 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की,केज तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यात यावे या मागणीचे लेखी निवेदन तहसीलदार केज यांना दिनांक २ ऑगस्ट २०२४ रोजी केज तालुका शिवसेना उबाठा गटाच्या वतीने देण्यात आले होते. 

केज शहरासह तालुक्यातील मटका, गुटखा,वाळू उपसा,चंदन तस्करी,गांजा विक्री,दारू विक्रीसह इतर अवैध धंदे हे खुलेआम चालू आहेत ते तात्काळ बंद करण्यात यावेत अशी मागणी केज तालुका शिवसेनेच्यावतीने तालुकाप्रमुख अशोक जाधव,किशोर घुले,तात्या रोडे,ज्ञानेश्वर बोबडे, वैजनाथ वाघमारे यांनी केली होती.सदर निवेदना मध्ये तात्काळ अवैध धंदे बंद न केल्यास दिनांक ८ ऑगस्ट २०२४ रोजी प्रशासनाला शिवसेनेच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता.प्रशासनाच्या वतीने निवेदनाची दखल न घेतल्यामुळे दिनांक ८  ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर केज तालुकाप्रमुख अशोक जाधव,किशोर घुले,तात्या रोडे,ज्ञानेश्वर बोबडे, वैजनाथ वाघमारे,रोहित कसबे,सुभाष ठोंबरे,सुधीर जाधव,दीपक काकडे,  गोकुळ मोरे हे आमरण उपोषणास बसले आहेत.

Post a Comment

0 Comments