Type Here to Get Search Results !

वस्ती वाढीसाठी संपादित जमीचे वाटप आणि स्मशानभूमीच्या मागणी साठी स्वातंत्र्यदिनी रिपाइंचे उपोषण.

 वस्ती वाढीसाठी संपादित जमीचे वाटप आणि स्मशानभूमीच्या मागणी साठी स्वातंत्र्यदिनी रिपाइंचे उपोषण.



केज/प्रतिनिधी 


केज तालुक्यातील केवड येथील वस्ती वाढीसाठी शासनाने संपादितकेलेल्या भूखंडाचे वाटप करणे आणि स्मशानभूमीच्या मागणीसाठी रिपाइंचे कार्यकर्ते स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तहसील कार्यालया समोर उपोषण करणार आहेत.या बाबतचीमाहिती अशी की,केवड ता.केज येथील मागासवर्गीय कुटुंबांच्या वस्तीवाढीसाठी सन १९७३-७४ मध्ये सर्व्हे नं.९५ मधील ८० आर म्हणजे २ एकर भूखंड मंजूर झाला होता.तो भूखंड शासनाने ग्राम पंचायत कडे वर्ग केला आहे.परंतु अद्याप त्या भूखंडाचे वाटप करण्यात आलेले नाही.म्हणून दिनांक १२ ऑगस्ट रोजी येथील नागरिकांनी रिपाइंचे तालुका अध्यक्ष दिपक कांबळे व दिलीप बनसोडे यांच्या नेतृत्वा खाली तहसीलदार सचिन देशपांडे यांना भेटून सदर भूखंडाचे तात्काळ वाटप करण्यात यावे.तसेच या जमिनीत स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात यावे. या आशयाचे निवेदन दिले आहे.या मागणीसाठी रिपाइंचे तालुका अध्यक्ष दिपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दि.१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी केज तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे.निवेदनावर समाधान तुपारे,हरेंद्र तुपारे,चंद्रमणी तुपारे,अंकुशतुपारे,लक्ष्मण तुपारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments