Type Here to Get Search Results !

भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या मराठवाडा संघटकपदी चंद्रकांत खरात सर यांची नियुक्ती

 भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या मराठवाडा संघटकपदी चंद्रकांत खरात सर यांची नियुक्ती



मिञ परिवाराकडुन अभिनंदनाचा वर्षाव.


केज/प्रतिनिधी


केज तालुक्यासह बीड जिल्ह्यातील दलित चळवळीमध्ये गेले २५ ते ३० वर्षापासून एकनिष्ठ सक्रिय काम करणारे नाव लौकिक असलेला कार्यकर्ता म्हणून सर्वांशी परिचित असलेले चंद्रकांत खरात सर यांच्या कार्याची  माजी सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य तथा खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी दखल घेऊन भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या मराठवाडा संघटकपदी नियुक्ती केली आहे.चंद्रकांत खरात सर यांनी अनेक पक्ष व संघटनेमध्ये काम करून गोरगरिबांचे शासन स्तरा वर प्रश्न मांडून कामे मार्गे लावली असल्यामुळेत्यांचा तालुक्यासह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनसंपर्क पाहावयास मिळत आहे.चंद्रकांत खरात सर हे वंचितबहुजन आघाडीमध्ये काम करत होते.परंतु सध्या त्यांनी वंचित बहुजन आघाडीला सोडून देऊन खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी भीमशक्ती सामाजिक संघटनेमध्ये दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजी प्रवेश केला आहे. खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी भीम शक्ती संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष संतोष भिंगारे यांना चंद्रकांत खरात सर त्यांना नियुक्ती देण्याचे आदेश दिले होते. सदर आदेशावरून संतोष भिंगारे यांनी चंद्रकांत खरात सर यांची मराठवाडा संघटकपदी निवड करण्यात आली आहे.संतोष भिंगारे यांनी चंद्रकांत खरात सर यांना मराठवाडा संघटकपदाच्या नियुक्तीचे पत्र देऊनत्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.चंद्रकांत खरात सर यांच्या निवडी मुळे त्यांच्या कार्यकर्त्यां मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर निवडीमुळे चंद्रकांत खरात सर यांना सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments