Type Here to Get Search Results !

कर्मवीर विद्यालयाचे सहशिक्षक धर्मराज संभाजी मस्के यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

 कर्मवीर विद्यालयाचे सहशिक्षक धर्मराज संभाजी मस्के यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन



केज/ प्रतिनिधी 


कर्मवीर विद्यालय  चिंचोली माळी या शाळेचे सहशिक्षक धर्मराज संभाजी मस्के सर यांचे अल्पशा आजाराने  दुःखद निधन झाले आहे. 


धर्मराज संभाजी मस्के रा. महात्मा फुले नगर केज वय ५७ वर्षे धर्मराज मस्के सर हे चिंचोली माळी येथील कर्मवीर विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. 

परंतु मस्के सर हे गेले काही दिवसापासून सतत आजारी होते. 

दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. 

त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार क्रांतीनगर येथील सार्वजनिक स्मशान भूमीत सायंकाळी ४-०० वाजण्याच्या सुमारास करण्यात येणार आहे. 

मस्के सर यांच्या निधनाची माहिती कळताच शहरासह परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

धर्मराज संभाजी मस्के सर यांना आदर्श क्रांती न्यूज परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

Post a Comment

0 Comments