Type Here to Get Search Results !

केज तहसील कार्यालया ला मिळणार पुर्ण वेळ तहसीलदार श्री.राकेश गिड्डे तहसीलदार पदाचा कार्यभार स्विकारणार.

 केज तहसील कार्यालया ला मिळणार पुर्ण वेळ तहसीलदार श्री.राकेश गिड्डे तहसीलदार पदाचा कार्यभार स्विकारणार.



केज /प्रतिनिधी 


केज तहसील कार्यालया ला आता पुर्णवेळ तहसील दार मिळणार असुन श्री. राकेश गिड्डे हे तहसीलदार  पदाचा लवकरच कार्यभार स्विकारणार आहेत.या बाबत सविस्तर माहीती अशी की,केज येथील तहसीलदारांचे पद मागील  कांही दिवसपासुन रिक्त होते.यामुळे येथे पुर्णवेळ तहसीलदार म्हणून कोण येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.नुकतेच  महाराष्ट्र शासनाने तहसील दार यांच्या बदलीचेआदेश काढले असून यात राकेश आण्णासाहेब गिड्डे यांची केज तहसीलदारपदी नियुक्ती केली आहे.तरुण  तडफदार अधिकारी अशी त्यांची कारकिर्द आहे.केज तालुक्याला तहसीलदार आले आता गटविकास अधिकारी कधी येणार ? याची केज तालुक्याला प्रतीक्षा लागलेली आहे. आता खोळंबलेली कामे त्वरीत मार्गी लागतील अशी आशा नागरीकव्यक्त करत आहेत.येथे जवळ पास तीन महिन्यांपूर्वी एसीबीने कारवाई करत कोतवालास लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.या घटने पासून तहसीलदार गायब असल्याने येथील पद रिक्त होते.तसेच येथील गट विकास अधिकारी पदही रिक्त असल्याने जनतेची कांमे खोळंबली असल्याने नागरिकांमध्ये मोठी ओरड झाली.आज राज्य शासना ने राज्यातील जवळपास ७० तहसीलदारांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.यामुळे केजसाठी राकेश आण्णासाहेब गिड्डे यांची नियुक्ती केली आहे. यामुळे तालुका महसूल प्रशासनाच्या कामात गती येईल असे चिन्ह दिसत आहे.तसेच कर्मचारी, तलाठ्यांचे लाड बंद करण्याचे आव्हान गिड्डे यांच्या समोर रहाणार आहे.परंतु गिड्डे यांची कारकीर्द तशी खमक्या अधिकारी अशीच असून, ते येथे आल्यानंतर दिसून येईलच,केजला तहसील दार मिळाले पण गट विकास अधिकारी कधी मिळणार अशी चर्चा आता तालुक्यात सुरू झाली आहे.

Post a Comment

0 Comments