Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेत शाहीर बंडु खराटे यांचा शैक्षणिक कार्यक्रम संपन्न.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेत शाहीर बंडु खराटे यांचा शैक्षणिक कार्यक्रम संपन्न.                  

केज /प्रतिनिधी 

दि.५ ऑगस्ट २०२४ सोमवार रोजी शाहीर बंडु खराटे यांनी जिल्हापरिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी ता.केज याशाळेत वेगवेगळे शैक्षणिक गीते, छोट्या छोट्या गोष्टी, पोवाडे याद्वारे विद्यार्थ्यांचे मनोरंजन करुन त्यांना आनंदी केले.प्रथम शाहीर बंडु खराटे व त्याची मुलगी कु.कार्तिकी बंडु खराटे यांचे या शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजाभाऊ कदम, बाळासाहेब राठोड , श्रीमती सोनाली भुमकर, श्रीमती गिताताई अंडील, श्री.भारत हांगे,श्री. बाबासाहेब मैंद यांनी शाल,श्रीफळ,पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.ऊसतोडी मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते,लगीनसराई, बिचारा मामा-बिचारा मामा,आनंददायी जिल्हा परिषद शाळा अशा गीताने,पोवाड्याद्वारे विद्यार्थ्यांना उपदेश केला.बालविवाह प्रतिबंधक बाबत ही माहिती देत गीता द्वारे उपदेश देऊन बालविवाह करु नये याबाबतआपल्या पालकांना,गावकऱ्यांना माहिती देण्यास सांगितले. बालविवाह प्रतिबंधक बाबत जनजागृती करण्या साठी शपथ घेण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजाभाऊ कदम यांनी केले.सुत्रसंचलन श्री. भारत हांगे सर यांनी केले.श्रीमती गिताताई अंडील यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments