Type Here to Get Search Results !

आदर्श शिक्षिका स्व.मिरा शिवदास तपसे-शिनगारे यांच्या स्मृती निमित्त मिराई स्कॉलरशिपचे वाटप कु.तपसे सुप्रिया शंकर,कु.तपसे माधवी उत्रेश्वर व कु.तपसे ज्योती दिपक या विद्यार्थीनी या वर्षीच्या मिराई स्कॉलरशिपच्या मानकरी.

 आदर्श शिक्षिका स्व.मिरा शिवदास तपसे-शिनगारे यांच्या स्मृती निमित्त मिराई स्कॉलरशिपचे वाटप

कु.तपसे सुप्रिया शंकर,कु.तपसे माधवी उत्रेश्वर व कु.तपसे ज्योती दिपक या विद्यार्थीनी या वर्षीच्या मिराई स्कॉलरशिपच्या मानकरी.



केज/प्रतिनिधी


केज तालुक्यातील चंदन सावरगाव येथे दि.१५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभदिनी लाल बहादूर शास्त्री विद्यालया च्या प्रांगणात मिराई प्रतिष्ठान आयोजित इयत्ता दहावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या मुलींना प्रतिवर्षी मिराई स्कॉलरशिपचे वितरण करण्यात येते याच अनुषंगाने याही वर्षी तपसे बंधुनी आपल्या मोठ्या भगिनीमार्गदर्शिका ज्यांनी आयुष्यभर महिलां साठीसामाजिक,शैक्षणिक कार्य करत समाज उभारणीचे कार्य करुन आपल्या अल्प आयुष्यात महिलांना स्वत: राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय सेवा भावी संस्था सुरू करुन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन करणे असो की बचत गटांची संकल्पना महिलांच्या मनात रुजवने यातुन महिलांना आत्म निर्भर बनविण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम  केले.मुळातच कुटुंबातील शैक्षणिक वातावरणात वाढलेल्या आणि आपल्या  आई -वडिलांचे शिक्षणा बाबत असलेले सकारात्मक विचार अंगी आत्मसात करून आयुष्यात शिक्षणाला महत्त्व देऊन शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना एकलव्य पुरस्कारासह अनेक शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार मिळवत उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर शिक्षण क्षेत्रात शिक्षिका म्हणून आपल्या  कारकीर्दीत यशस्वी शिक्षिका म्हणून ज्यांनी कार्य केले.सम्राट अशोक माध्यमिक विद्यालय गोटेगाव शाळेच्या माध्यमातून अविरत चौदा वर्षे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा सतत प्रयत्न करत एक आगळा वेगळा आदर्श समाजापुढे ठेवत ज्ञानदानाचे कार्य ज्यांनी केले अशा आदर्शशिक्षिका स्व.मिरा शिवदास तपसे (शिनगारे)यांच्या प्रेरणा दायी प्रवासाच्या पाऊलखुणा तेवत ठेवण्याचे कार्य आपल्या मोठ्या बहिणीच्या नावे गुणवंत विद्यार्थी स्कॉलरशिप सुरू करुन भावांनी बहीणीच्या प्रेरणादायी स्मृतींनाडोळ्या समोर ठेवून स्थापन केलेल्या "मिराई प्रतिष्ठान" आयोजित गुणवंत विद्यार्थीनींना "मिराई स्कॉलरशिप २०२४" चे वितरण लालबहादूरशास्त्री विद्यालय चंदनसावरगाव येथील मुख्याध्यापक श्री.दिलीप देशमुख,सह शिक्षक श्री.बालासाहेब मदन तपसे व शाळेतील सर्व शिक्षक वृंद व आयोजक श्री.महेश शिवदास तपसे मिराई प्रतिष्ठान यांच्या शुभहस्ते स्कॉलरशिपच्यायावर्षीच्या मानकरी प्रथम क्रमांक कु. तपसे सुप्रिया शंकर स्कॉलरशिप रु ५००० व सन्मानचिन्ह द्वितीय क्रमांक कु.तपसे माधवी उत्रेश्वर स्कॉलरशिप रु.३००० व सन्मानचिन्ह तृतीय क्रमांक कु.तपसे ज्योती दिपक स्कॉलरशिप  रु २००० व सन्मानचिन्ह देऊन गुणवंतांना गौरविण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून चंदनसावरगावचे सरपंच जालिंदर दळवी,उप सरपंच शंकर तपसे,सेवा सोसायटीचे चेअरमन संजयकुमार तपसे,माजी सरपंच शत्रुघ्न तपसे, उत्तरेश्वर विष्णू तपसे, धर्मराज तपसे,नामदेव मगर व शाळेतील सर्व विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक  सर्व गावकरी यांची विशेष उपस्थिती  होती.यावेळी सर्व उपस्थितांचे आभार आयोजक महेश शिवदास तपसे यांनी मानले व सदरील कार्यक्रमयशस्वीते साठी महेशअरविंद तपसे, सुरज शेंडगे,विशालतपसे, अशोक धपाटे,कृष्णा नखाते यांचे सहकार्य लाभले व सर्वांच्या सहकार्याने गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments