Type Here to Get Search Results !

केज येथे बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महा विकास आघाडीच्या वतीने केज तहसीलदार यांना निवेदन देऊन सदर घटनेचा केला निषेध.

 केज येथे बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महा विकास आघाडीच्या वतीने केज तहसीलदार यांना निवेदन देऊन सदर घटनेचा केला निषेध.



केज/प्रतिनिधी


केज येथे बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महा विकास आघाडीच्यावतीने केज तहसीलदार यांना निवेदन देऊन सदर घटने चा निषेध नोंदवला आहे. 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की,महाराष्ट्र राज्यातील बलात्काराचे वाढते प्रमाण व बदलापूर येथील अत्याचार प्रकरणा तील आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीकरिता महा विकास आघाडीच्यावतीने केज तहसील कार्यालया समोर सदर घटनेचा निषेध नोंदवून सदर मागणीचे निवेदन केज तहसीलचे प्रभारी तहसीलदार सचिन देशपांडे यांना देण्यात आले.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अशोक जाधव,शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेशतात्या पाटील,तालुकाप्रमुख शंकर जाधव,शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे युवक केज तालुकाध्यक्ष कैलास चाळक,काँग्रेसचे तालुका प्रमुख प्रवीण खोडसे,युवराज मगर, शहरप्रमुख तात्या रोडे, युवासेना तालुकाप्रमुख किशोर घुले,तालुका संघटक लक्ष्मण गलांडे, उपतालुकाप्रमुख सुभाष ठोंबरे,युवा सेना विधान सभाप्रमुख ज्ञानेश्वरबोबडे, उपशाखाप्रमुख पप्पू ढगे, वैजनाथ वाघमारे,सुरज वाघमारे,मारुती पाटील, आप्पा कांबळे,बाबासाहेब देशमुख,तुकाराम घोडके यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments