Type Here to Get Search Results !

रॅगिंगमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त होऊ शकते.-प्रा.हनुमंत भोसले.

 रॅगिंगमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त होऊ शकते.-प्रा.हनुमंत भोसले.



केज/प्रतिनिधी 


महाविद्यालयीन जीवनात अनेक विद्यार्थी स्वैर वागताना आपल्या खालच्या वर्गातील व आपल्या पेक्षा लहान विद्यार्थ्यांचा विविध प्रकारे मानसिक व शारीरिक छळ करतात.यामुळेअनेक विद्यार्थी मोठ्या विद्यार्थ्यांनी सार्वजनिक ठिकाणी व जाहीरपणे केलेला असा छळ,टिंगल चेष्टा-मस्करी सहन करू शकत नाहीत व परिणामतः आत्महत्या करतात.या बाबीकायद्याने गुन्हा असून यासाठी कायद्यात किमान दोन वर्षांचा कारावास व दहा हजार रुपये दंड अशा शिक्षेचे प्रावधान असून अशा गोष्टीपासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते केज न्यायालया अंतर्गत कार्यरतपॅरालीगल वॉलिनटीअर हनुमंत भोसले यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणबीड व जिल्हा सत्र न्यायालयाच्या वतीने आयोजित केज येथील बाबुरावजी आडसकर महाविद्यालयातअँटीरॅगिंगमार्गदर्शन शिबिरात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.डाॕ.एम.जी.फावडे हे होते तर विचारपीठावर विधिज्ञ एस.व्ही.मिसळे, पीएलव्ही संजय खळगे, भाग्यश्री काकडे, प्रा.किर्दतसर,प्रा.डॉ.बी.जे.हिरवे सर यांची उपस्थिती होती.रॅगिंग सारख्या बाबी विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगारी वृत्ती निर्माण करते.वरच्या वर्गातीलविद्यार्थीअहंभावा तून खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा मानसिक व शारीरिक छळ होईलअशी कृत्ये करतात.ज्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी जाहीररित्या त्यांना अपमान वाटेल अशी कृत्ये ज्यामध्ये उड्या मारणे, उठबश्या काढणे,अर्ध नग्न होणे,गाणे म्हणणे किंवा इतर लाज वाटेल असे कृत्य करायला सांगतात, त्यांना उद्धेशून टोमणे मारले जातात.त्यांनी मना सारखे तसे न केल्यास त्यांना मारहाण केलीजाते. यामुळे कांही विद्यार्थी अशा गोष्टी सहन न करू शकल्याने जीवन संपवतात.वास्तविक पाहता या बाबी कायद्याने चुकीच्या असल्याने अशा गोष्टी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कायद्याने दोन वर्षांचा कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा आहे.इतकेच नाही तर असा गुन्हा करणाऱ्या विद्यार्थ्यांस किमान पाच वर्षे किंवा कायमची शिक्षण बंदीची शिक्षादिली जाऊशकते.म्हणूनविद्यार्थी व पालकांनीही आपली मुले अशा गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकणार नाहीत याची काळजी घ्यावी असे आवाहन  हनुमंत भोसले यांनी केले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डाॕ.एम.जी.फावडे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जेष्ठ विधिज्ञ एस.व्ही. मिसळे यांनी केले.यावेळी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments