Type Here to Get Search Results !

बीड जिल्हा योगासनस्पोर्ट चॅम्पियन स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा ढाकेफळ शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश.

 बीड जिल्हा योगासनस्पोर्ट चॅम्पियन स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा ढाकेफळ शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश. 



केज/प्रतिनिधी


नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि ब्रिहंत महाराष्ट्र योगा परिषद अंतर्गत बीड जिल्हा योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढाकेफळ चे विद्यार्थी सहभागी झाले   त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.या शाळेतील चि.पवन भरत थोरात आणि कु.सिद्धी जनक थोरात या विद्यार्थ्यांनी आर्टिस्टिक्स सिंगल या योग प्रकारात सहभाग घेतला होता.चि.उत्कर्ष भाऊसाहेब घाडगे व चि. राजवीर महादेव थोरात या विद्यार्थ्यांनी ट्रॅडिशनल योगा या योग प्रकारात सहभाग घेतला होता. दोन्ही प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.कुमारी सिद्धी जनक थोरात या विद्यार्थिनीने अप्रतिम प्रदर्शन करत जिल्हा स्तरा वर द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे आणि दि.१६,१७,१८ ऑगस्ट तारखेला संगमनेर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी ती पात्र झालेली आहे.या स्पर्धेसाठी योगा प्रशिक्षक श्रीमती नेहरकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली. मुख्याध्यापक श्री.अंधारे सर व सर्व स्टाफ शिक्षक यांनी त्यांना सहकार्य केले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments