Type Here to Get Search Results !

महावितरण कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे सर्जेराव गुळवे यांचा दुर्दैवी मृत्यू केज विधानसभेच्या आमदार नमिता मुंदडा यांनी स्वतःच्या प्रसिद्धी साठी काढलेल्या चुकीच्या पत्राचा जाहीर निषेध. - माजी आ.पृथ्वीराज साठे

 महावितरण कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे सर्जेराव गुळवे यांचा दुर्दैवी मृत्यू

केज विधानसभेच्या आमदार नमिता मुंदडा यांनी स्वतःच्या प्रसिद्धी साठी काढलेल्या चुकीच्या पत्राचा जाहीर निषेध. - माजी आ.पृथ्वीराज साठे



केज/प्रतिनिधी


महावितरण कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे सर्जेराव गुळवे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.केज विधानसभेच्या आमदार नमिता मुंदडा यांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काढलेल्या चुकीच्या पत्राचा जाहीर निषेधकरत आहे असे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी फेसबुक व व्हाट्सअप ग्रुप वर पोस्ट करून म्हटले आहे.याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,नेकनूर येथील सर्जेराव गुळवे यांचा मृत्यू हा महावितरण कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे झाला आहे. केजच्या आमदार यांनी पत्रात उल्लेख केला आहे की तुटलेल्या विद्युततारेला चिटकून विजेचा शॉक बसल्याने सर्जेराव गुळवे यांचा मृत्यू झाला असे पत्र त्यांनी दिले त्याचा मी जाहीर निषेध करतो असे सदर पोस्टमध्ये माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी म्हटले आहे.मीस्वतः घटनास्थळी जाऊनपाहिले तर अक्षरशः विद्युत तारा एकदम खाली आलेल्या आहेत त्या ताराला चिटकून सर्जेराव गुळवे यांचा मृत्यू झाला आहे. महावितरण कंपनीला वारंवार गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी पत्र देऊन सुद्धा त्याकडे लक्ष दिले नाही म्हणून गुळवे यांचा मृत्यू हा महावितरण कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे झाला आहे. 

इकडे लोक जीवांशी जात आहेत मात्र लोकप्रतिनिधी पत्र देऊन प्रसिद्धी कशी मिळवता येईल हेच बघत आहेत.त्यांनी काढलेल्या या चुकीच्या लेखी पत्राचा जाहीर निषेध करतो. विषय कोणताही असो सोशल मीडियावर पत्र वायरल करून वाटेल ते  लोकप्रतिनिधी श्रेय घेण्या साठी इतक्या खालच्या दर्जाचे राजकारण करत आहेत.लोकप्रतिनिधींनी पत्र देत असताना परिपूर्ण माहिती घेऊन पत्र दिले पाहिजे अशी सोशल मीडियावर माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी पोस्ट टाकून केज मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांचा जाहीर निषेध नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments