Type Here to Get Search Results !

साबला येथील मागासवर्गीय स्मशान भूमीवर अतिक्रमण करणाऱ्या लोकांची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करावी -राहुल सरवदे सदर अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा प्रशासनाला ईशारा.

 साबला येथील मागासवर्गीय स्मशान भूमीवर अतिक्रमण करणाऱ्या लोकांची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करावी -राहुल सरवदे

सदर अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा प्रशासनाला ईशारा. 



केज/प्रतिनिधी


साबला येथील मागास वर्गीय स्मशानभूमीवर अतिक्रमण करणाऱ्या लोकांची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच सदर अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माजी तालुकाध्यक्ष राहुल सरवदे यांनी लेखी निवेदनाद्वारे प्रशासनास दिला आहे. 

या बाबतची सविस्तर माहिती अशी की,केज तालुक्यातील साबला येथील मागासवर्गीय स्मशानभूमीवर अतिक्रमण करण्यात आले आहे.मागासवर्गीय स्मशानभूमी वर अतिक्रमण करणाऱ्या लोकांचे सखोल चौकशी करून अतिक्रमण हटवुन संबंधित लोकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणी साठी दिनांक १७जानेवारी २०२४ रोजी पासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माजी तालुकाध्यक्ष राहुल सरवदे हे तहसीलदारकेज, गट विकास अधिकारी पंचायत समिती केज, उपअभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती केज यांच्यासह संबंधित कार्यालयाकडे लेखी तक्रार करून व वेळोवेळी प्रत्यक्षात अधिकारी कर्मचारी यांना भेटून पाठपुरावा करून देखील सदर प्रकरणी अद्यापही कारवाई करण्यात आली नाही.त्यामुळे राहुलसरवदे यांच्यासह नागरिकांनी तात्काळ सदर प्रकरणी प्रशासनाने दखल घेतली नाही तर आंदोलन करण्याचा निवेदनाद्वारे प्रशासनास इशारा दिला आहे.तसेच दिनांक १८ मार्च २०२४ रोजी उप अभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती यांना देखील लेखी तक्रार देऊन दलित स्मशानभूमी तील दहन शेडच्या कामाचे बिल काढण्यात येऊ नये म्हणून लेखी तक्रार दिली आहे.साबला येथील महार हाडोळा अंतर्गत सर्वे नं. १९ गट नं.११६ मध्ये मागासवर्गीय बौद्धसमाजा साठी ०५ आर जमीन ही स्मशानभूमीसाठी दिलेली असून तेथे स्मशानभूमी शेड बांधून रिकामी असलेली जागा सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगनमताने हडपकरण्यात आली आहे तसेच त्या ठिकाणी दलित समाजा तील नागरिकाचा मृत्यू झाल्यास अंत्यविधी करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होऊन जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे सरवदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.सदर ठिकाणी पूर्वी असलेल्या मयत केलेल्या लोकांचे थडगे व समाधी सरपंच व ग्रामसेवक यांनी संगणमत करून काढल्या आहेत. असा आरोप देखील राहुल सरवदे यांनी केला आहे. सदर समाधी व थडगे सरपंच व ग्रामसेवक यांनी जाणीवपूर्वक काढले आहेत त्यामुळे आमच्या समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत त्यांनी आमच्या समाजांना जाणीवपूर्वक टार्गेट करून अपमानित केले आहे असे बोलताना त्याने स्पष्ट केले आहे.सदर प्रकरणी गट विकास अधिकारी यांनी साबला ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांना तीन वेळा पत्र काढून कळवले की,सदर स्मशान भूमीवर अतिक्रमण करणाऱ्या लोकांची सखोल चौकशी करून अतिक्रमण हटवुनसंबंधित लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या आशयाचे तीन वेळा पत्र काढले असताना देखील सरपंच व ग्रामसेवक जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत असाही राहुल सरवदे यांनी आरोप केला आहे. 

जर प्रशासनाने तात्काळ आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर मी व माझे समाज बांधव मिळून आम्ही आंदोलन करणार आहोत असे बोलताना त्यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments