Type Here to Get Search Results !

No title

 बनसारोळा येथील जनविकास महाविद्यालय येथे कायदे विषयक जन जागरण शिबीर संपन्न.




केज /प्रतिनिधी 


दि.२७ आॕगष्ट २०२४ रोजी तालुका विधी सेवा समिती केज व वकीलसंघ केज यांच्या संयुक्त विद्यमाने कायदे विषयक जनजागृती शिबीराचे आयोजन जनविकास महाविद्यालय,बनसारोळा येथे मंगळवारी सकाळी ०९-३० वाजताआयोजित  करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री.के.डी. जाधव,जिल्हा व अतिरिक्त  सत्र न्यायाधीश श्री.एस. बी.भाजीपाले सर हे होते.

कार्यक्रमास सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. ए.एस.राठोड,गट शिक्षणाधिकारी श्री.लक्ष्मणराव बेडसकर सर,केंद्रप्रमुख श्री.अर्जुन बाबासाहेब बोराडे,प्राचार्य डॉ.श्री.बाबासाहेब गोरे,विधीज्ञ सर्वश्री बी.एन.ढाकणे,बी.एल. यादव,डी.टी.सपाटे,एस. व्ही.मिसळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.श्री.बाबासाहेब गोरे यांनी कायदेविषयक माहिती सांगितली.यावेळी जेष्ठ विधीज्ञ डी.टी.सपाटे यांनी युवा दिन व मादक पदार्थाचा गैरवापर या विषयावर माहिती सांगितली.गट शिक्षणाधिकारी श्री.एल. बी.बेडसकर यांनी रॅगिंग कायद्याबददल विस्तृत अशी माहिती सांगितली. पोलिस निरीक्षक श्री. प्रशांत महाजन यांनी वाहतुकीचे नियम याबद्दल  उपस्थितांना मार्गदर्शन केले.जिल्हा व अतिरिक्त  सत्र न्यायाधीश श्री.एस. बी.भाजीपाले सर यांनी युवा दिन,वाहतुकीचेनियम व रॅगिंग कायद्याबद्दल  उपस्थिताना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री.के.डी. जाधव यांनी युवा दिन, मादक पदार्थाचा गैरवापर, रॅगिंग कायदा,वाहतुकीचे नियम या सर्व विषयांवर वेगवेगळी उदाहरणे देत उपयुक्त अशी माहिती उपस्थित विद्यार्थी,शिक्षक, प्राध्यापक यांना दिली.या

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.एस व्ही.मिसळे यांनी केले तर आभार श्री.कदम सर यांनी मानले.या कार्यकमास विद्यार्थी, शिक्षक,प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांसह १८५ लाभार्थी उपस्थित होते.कार्यकमाच्या शेवटी रंगिंगबद्दलचे माहितीपत्रक व वाहतुकीचे नियम या विषयावरील माहितीपत्रके उपस्थितांना वाटप करण्यात आली.

Post a Comment

0 Comments