Type Here to Get Search Results !

जुनी पेन्शन संघटनेचा १७ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर पेन्शन क्रांती मुंडण मोर्चा पेन्शन क्रांती मुंडन मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे -- किशोर भालेराव

 जुनी पेन्शन संघटनेचा १७ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर पेन्शन क्रांती मुंडण मोर्चा

पेन्शन क्रांती मुंडन मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे -- किशोर भालेराव



केज/प्रतिनिधी 


१ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या सर्वकर्मचाऱ्यांना तत्कालीन शासनाने १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना रद्द करून नवीन अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे.ही योजनाराबवताना कसल्याही प्रकारचे नियोजन न करता घाई गडबडीत शासनाने हा निर्णय घेवून कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधकारमय केले आहे.आज या योजनेला १८ पूर्ण वर्षे झाली,पण म्हणावी तशी अंमल बजावणी झाली नाही. कपातीवर आधारित असलेल्या या योजनेत एनपीएस धारकांना मात्र कसलाही शासनवाटालाभ मिळत नाही.शासनाची व्याजाची रक्कम जमा होत नाही,तर आजवर कपात झालेल्यारकमेचाही हिशोब मिळत नाही. एकंदरीत ही नवीन पेन्शन योजना कसलाही फायदा नसलेली आहे. कर्मचाऱ्यांना कसल्याही प्रकारची सुरक्षितता नसलेली ही पेन्शनयोजना आहे.शासनाच्या हस्तक असलेल्या काही संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन जीपीएस नावाची नवीन योजना पुन्हा एकदाकर्मचाऱ्यांच्या माथी मारण्याचा घाट शासन करीत आहे.नागपूर येथे झालेल्या महाआक्रोश मोर्चा नंतर महाराष्ट्र शासनाने येणाऱ्या अधिवेशनात सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करू असे आश्वासित केले होते. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने एक सुकाणू समितीची निर्मिती करून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते,मात्र येथे सुद्धा महाराष्ट्र शासनाने चलाखी करून जुन्या पेन्शनच्या नावाखाली कर्मचाऱ्यांच्या तोंडी पाने पुसली आहेत. समितीच्या शिफारशी नुसार GPS नावाचीनविन पेन्शन योजना यासमितीने प्रास्तावित केली आहे. सदर योजनेचे स्वरुप NPS योजनेसारखेच फसवे असल्याचे प्रथम दर्शनी लक्षात येत असल्याने राज्यातील सर्व DCPS/NPS धारक याचा तीव्र निषेध करीत आहेत.जुनी पेन्शनयोजना पूर्ववत लागू करण्याचा निर्णय न घेता शासन वारंवार DCPS, NPS आणि आता GPS सारख्या फसव्या योजना सबंधित कर्मचाऱ्यांना विचारात न घेता त्यांच्या वर लादत आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये शासन धोरणाविषयी प्रचंड रोष निर्माणझालाआहे.राज्यात जुनी पेन्शन योजना बंद करुन अठरा वर्षाहून अधिक कालखंड झाला असून आता अनेक कर्मचारी सेवानिवृत झाले आहेत तरी काही सेवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत.अश्यावेळी शासनाची DCPS आणि NPS योजना पेन्शन विषयक लाभ देण्यासाठी पुर्णतःअपयशी झाली आहे.त्यातुन या नविन GPS योजनेवर कर्मचारी विश्वास ठेवण्यास तयार नाहीत.छत्तीसगड ,मध्य प्रदेश,राजस्थान,कर्नाटक,तेलंगणा,आंध्र प्रदेश या सारख्या आर्थिक दृष्ट्या कमी सक्षम असलेल्या राज्यांना सुद्धा जुनीपेन्शन योजना लागू केली मग आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि पुरोगामी असलेल्या महाराष्ट्राला हे का परवडत नाही असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे.

महाराष्ट्रातील १ नोव्हेंबर  २००५ व त्यानंतर नियुक्त कर्मचारी व अधिकारी यांची एकमेव मागणी ही सरसकट जुनी पेन्शन योजना अर्थात महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम १९८२ व महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण)१९८४ तसेच भविष्य निर्वाह निधी (GPF) सह लागू करणे ही आहे. कर्मचाऱ्यांना सरकारची प्रस्तावित सुधारीत निवृत्तिवेतन योजना / आश्वासित पेन्शन योजना (GPS) मान्य नाही. राज्यात जुन्या पेन्शन ऐवजी GPS किंवा अन्य कोणतीही योजना आणणे किंवा लागू करणे हे कर्मचाऱ्याचे सेवानिवृत्ती नंतर भविष्य उध्वस्त करणे होईल.त्यातुन कर्मचाऱ्यामध्ये शासन धोरणाविषयी रोष वाढत जाणार आहे.जीपीएस नावाच्या फसव्यायोजनेचा फटका राज्यातील २४ लाख कर्मचाऱ्यांना बसणार आहे.यामुळे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने 'जो देईलपेन्शन, त्यालाच निवडणुकीत समर्थन' 'वोट फॉर ओपीएस' नावाची मोहीम राबवलेली आहे.या माध्यमातून राज्यातील कर्मचाऱ्यांचा आक्रोश व्यक्त होणार आहे.त्यामुळे शासनाला जागे करण्या साठी तसेच DCPS,NPS आणि आता GPS सारख्या फसव्या योजना कर्मचाऱ्यांवर न लादता, राज्यातील सर्व कर्मचाऱ्याना म.ना.से.बि. १९८२-८४ अंतर्गत जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याचा निर्णय घ्यावा.यासाठी राज्य भरा तील लाखो कर्मचारी महाराष्ट्रात वेगवेगळी आंदोलने करत आहेत. म्हणूनच बीड जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना, महसूल विभाग,पंचायत विभाग,जिल्हा परिषद, आरोग्य विभाग,कृषी विभाग,आयटीआय,ट्रेझरी विभाग,पोलीसआस्थापना विभाग,आणि इतर सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी एकत्रित येऊन महाराष्ट्र शासनाच्या धोरणाच्या विरोधात पेन्शन क्रांती मुंडन मोर्चा काढत आहे.पेन्शन योजने बाबत कर्मचाऱ्यांच्या मनात शासनविरोधात असलेल्या आक्रोश शासनापर्यंत पोहचण्या साठी १७ ऑगस्ट २०२४ वार शनिवार रोजी दुपारी तीन वाजता सिद्धि विनायक कॉम्प्लेक्स ते जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे जुनी पेन्शन संघटनेचा जिल्हाव्यापी पेन्शन क्रांती मुंडण मोर्चा चे आयोजन केले आहे तरी बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्तडिसीपीएस व एनपीएस धारकांनी या महाआक्रोश मुंडण मोर्चाला उपस्थित राहुन मोर्चा यशस्वी करावा असे आवाहन महाराष्ट राज्य जुनी पेन्शन संघटनाशाखा केज च्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments