Type Here to Get Search Results !

राज्यस्तरीय कृषी महोत्सव २०२४ चे उद्घाटन देशाचे कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न आता राज्यात लाडका भाऊ शेतकरी अभियान-मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे

 राज्यस्तरीय कृषी महोत्सव २०२४ चे उद्घाटन देशाचे कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न



 आता राज्यात लाडका भाऊ शेतकरी अभियान-मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे



केज/प्रतिनिधी


परळी  वैद्यनाथ येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सव २०२४ चे उद्घाटन देशाचे कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.या  कार्यक्रमास महायुतीचे आमदार लोकनेत्या पंकजाताई मुंडे,सुरेश धस, बाळासाहेब आजबे, प्रकाश सोळुंके यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी आमदार यावेळी उपस्थित होते. या वेळी सर्वप्रथम शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून नियोजित कृषी प्रदर्शन कार्यक्रमाकडे मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली यावेळी विविध ढोल ताशे व लेझीम पथक यासह फटाक्याच्या आतिषबाजीने परळी शहर दुमदुमून गेले होते या कार्यक्रमासाठी  कृषिमंत्री धनंजय मुंडे व त्यांचे खंदे समर्थक वाल्मिक आन्ना कराड यांनी जिल्ह्यात कृषी प्रदर्शन घेण्यासाठी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला असे बोलताना देशाची कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी आपले मत व्यक्त केले व आपल्या मागण्या मी पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहील असे  बोलताना स्पष्ट केले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, आम्ही महायुतीचे सर्व मंत्री आपल्या सोबत आहोत आम्ही शेतकऱ्यांना आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आम्ही यापुढे लाडका भाऊ शेतकरी योजना आणणार आहोत व मी कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या अगोदर यासाठी बोलत आहे की, मलाही काही आमच्या राज्यासाठी मागायचे आहे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे कृषिमंत्री यांनी आमच्या राज्यासाठी भरभरून द्याव व तुम्ही द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो असे मत त्यांनी व्यक्त केले तसेच शेतकऱ्यांसाठी थकीत लाईट बिल माफ करून येथून पुढे हे बिल भरायचे नाही व ई पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांना ही दिलासा दिला आज शेतकऱ्यांच्या सातबारावर ई पीक पाहणी झालेले नाही अशा शेतकऱ्यांनाही सरसकट अनुदान देणार असल्याची घोषणा केली तर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत हे सरकार शेतकऱ्यांचे आहे सर्वसामान्यांचे आहे सरकारकडून अडीच कोटी लाडकी बहीण योजनेचे ध्येय आहे तर आतापर्यंत एक कोटी तीस लाख अर्ज मंजूर झाले आहेत तर काही महिलांच्या खात्यावर पैसे ही जमा करण्यात आलेले आहेत तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या मराठवाड्याच्या हक्काचे पन्नास टीएमसी पाणी आपल्या जिल्ह्यात काही दिवसातच पोहोच करणार असल्याची माहिती दिली व यापुढेही आम्ही शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल यासाठी प्रयत्नशील राहुत तसेच  नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याचे वितरण  मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते याच स्टेजवरून वितरण होणार आहे असे स्पष्ट मत व्यक्त केले. 

पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भाषणात धनु भाऊचे भरभरून असे कौतुक केले व मला या कार्यक्रमात विश्रांती मिळाली असे मत व्यक्त केले .तर सर्व मंत्री महोदयांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे व त्यांच्या टीमचे भरभरून असे कौतुक केले तर धनंजय मुंडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले की, मी व सर्व मंत्री मंडळ शेतकर्यांच्या बाजूने आहे . परंतू मला आज गोपीनाथ मुंडे साहेब  व माझे वडील पंडित आण्णा  मुंडे यांची कमतरता जाणवत आहे असे मत व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments