Type Here to Get Search Results !

शिवसेनेच्या भगवासप्ताह चौथा दिवस जेष्ठ शिव सैनिकांचे सत्कार व चावडी बैठक संपन्न.

शिवसेनेच्या भगवासप्ताह चौथा दिवस जेष्ठ शिव सैनिकांचे सत्कार व चावडी बैठक संपन्न.
केज /प्रतिनिधी 

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते सुनिल प्रभू, शिवसेना उपनेते मराठ वाडा समन्वयक विश्वनाथ नेरूरकर,शिवसेना उपनेत्या प्रा.सुषमाताई अंधारे,लोकसभाप्रमुख सुनिल धांडे,सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.०७आॕगष्ट २०२४ रोजी भगवा सप्ताहात चौथ्या दिवशी शिवसेना बीड संपर्कप्रमुख परशुराम जाधव व जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना तालुकाप्रमुख अशोक जाधव यांच्या आयोजनात बोबडेवाडी,युसुफवडगाव येथे जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला.
ज्या सर्व जेष्ठ शिवसैनिकां नी संघटनेचे पक्षात रूपांतर केले.शिवसेनेचे रोपटे वाढवण्यासाठी जिवाचे रान केले त्यांच्या बद्दल त्याचे आभार व्यक्त करण्यासाठी हा जेष्ठ शिव सैनिकांचा सत्कार करण्यात आला.पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी जेष्ठ शिवसैनिक जे काही मार्गदर्शन करतील त्या प्रमाणे आम्ही पक्षवाढी साठी कार्य करू असे केज शिवसेना तालुकाप्रमुख अशोक जाधव यांनी सांगितले.यावेळीशिवसेना तालुकाप्रमुख अशोक जाधव,जिल्हा सचिव रोहित कसबे,शहरप्रमुख तात्या रोडे,उपतालुका प्रमुख सुरज वाघमारे, युवासेना उपतालुकाप्रमुख ज्ञानेश्वर बोबडे,वैजनाथ वाघमारे पदाधिकारी व शिवाजीबोबडे,बाबासाहेब बोबडे,साहेबराव बोबडे, संजय बोबडे,संतोषबोबडे, रामभाऊ पवार,भारत बाबर,माणिक जावळे, व्यंकट सावंत,दुर्लिंग चोपणे,नामदेव चोपणे, माणिक राऊत सह जेष्ठ शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments