Type Here to Get Search Results !

बदलापूर घटनेतील आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी.- शिवाजी दादा ठोंबरे

 बदलापूर घटनेतील आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी.- शिवाजी दादा ठोंबरे



केज/प्रतिनिधी


बदलापूर घटनेतील आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशीमागणी लेखी निवेदनाद्वारे छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी दादा ठोंबरे यांनी तहसीलदार केज यांच्या कडे केलीआहे.याबाबतची  सविस्तर माहिती अशीकी, बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्यावर झालेल्या अत्याचाराची घटना अतिशय निंदनीय आहे सदर घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे सध्या कायद्याचा धाक नसल्याने अशा वेदनादायी घटना वारंवार घडत आहेत त्यामुळे या अशा घटनेत जबाबदार आरोपीस तात्काळ फाशी देण्याची तरतूद सरकारने करावी जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत याची जबाबदारी सरकारने पूर्ण जिम्मेदारी घेतली पाहिजे. 

त्याचबरोबर त्याच धर्तीवर महिला व मुलींसाठी विशेष शाखा असावी अशी मागणी बालहक्क आयोगाने महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. बदलापूर येथे लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यास होत असलेला विलंब लक्षात घेऊन राज्य बालहक्क संरक्षणआयोगा ने महिला व बालकांसाठी गुन्हे शाखेच्या धर्तीवर विशेष शाखा स्थापन करावी अशी मागणी छावा संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवाजी दादा ठोंबरे यांनी केली आहे.या वेळी जिल्हाध्यक्ष शिवाजी दादा ठोंबरे,पत्रकार श्रीकांत जाधव,आसाराम बाबर,अशोक जगताप, सुनील बर्डे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत सदर लेखी निवेदन केज तहसीलचे पेशकार श्री.नन्नवरे यांनी स्वीकारले आहे.

Post a Comment

0 Comments