Type Here to Get Search Results !

मिलिंद एकबोटे यांना केज शहरात येण्यास बंदी घालण्यात यावी- दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समिती २ सप्टेंबर रोजी दलित समाजाच्या वतीने केज शहरात होणार तिव्र निदर्शने

 मिलिंद एकबोटे यांना केज शहरात येण्यास बंदी घालण्यात यावी- दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समिती


२ सप्टेंबर रोजी दलित समाजाच्या वतीने केज शहरात होणार तिव्र निदर्शने



केज/प्रतिनिधी


मिलिंद एकबोटे यांना केज शहरात येण्यास बंदी घालण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समिती केज च्या पदाधिकाऱ्याने तहसीलदार यांच्याकडे केली आहे. 

 याबाबतची सविस्तर माहिती अशी की दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी केज येथे  हिंदू जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मध्ये भीमा कोरेगाव हल्ल्यातील मुख्य आरोपी असणारी व्यक्ती मिलिंद एकबोटे ही असून हि व्यक्ती केज शहरात येणार आहे.तरी आंबेडकरी समाजाच्या वतीने केज शहरात  त्यांना येवुन देवु येऊ नये. व त्यासाठी त्यांना बंदी घालावी. जर काही वक्तव्याच्या कारणाने दंगलीसारखी  परिस्थिती उद्भवली तर त्यास प्रशासन जबाबदार राहील त्या अनुषंगाने आंबेडकरी समाजाच्या वतीने दिनांक २ सप्टेंबर २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक केज ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भव्य निदर्शने करण्यात येणार आहेत. असे तहसीलदार केज यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

या लेखी निवेदनावर अशोक गायकवाड,सुमित शिंदे,लखन हजारे,शरद धीवार,विशाल मस्के, बाबासाहेब मस्के,योगेश गायकवाड,प्रीतम खरात,मनोज मस्के,समाधान हजारे, रोशन सरवदे यांच्यासह दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments