Type Here to Get Search Results !

संविधान जागर यात्रा केज शहरात दाखल. केज शहरात संविधान यात्रेचे जंगी स्वागत

 संविधान जागर यात्रा केज शहरात दाखल.

केज शहरात संविधान यात्रेचे जंगी स्वागत


केज /प्रतिनिधी 


महाराष्ट्र राज्यामध्ये संविधान जागरसमितीच्या वतीने आयोजित केलेली संविधान जागर यात्रा केज शहरांमध्ये डॉ.आंबेडकर चौक व जयभीम नगर येथील बौद्ध विहारामध्ये आली.यावेळी स्थानिक बौद्धउपासकउपासिकांनी यात्रेचे जंगी स्वागत केले.त्या नंतर संविधान जागर यात्रे चा उद्देश सगळ्यांना नेमकेपणाने सांगण्यात आला.मुख्यतः भारतामध्ये सध्या संविधानाच्यानावाने जो खोटा प्रचार चालू आहे व ज्यायोगे संविधान बदलणार अशा खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत त्यांची पोलखोल करण्यासाठी व देशातील संविधानाची मजबूत स्थिती समजावून सांगण्या साठी ही यात्रा मुख्यतः सुरू झालेली आहे.जेलोक आपल्या पक्षाच्या विजया साठी संविधानाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा सर्वांनी नेमके संविधानासाठी केले तरी काय ? व दलित वंचित समाजासाठीनेमकी केलेली कामे तरी काय? असे रोखठोक सवाल या संविधान यात्रेत विरोधकांना विचारले जात आहेत.त्याचवेळी सध्या विद्यमान केंद्र सरकारने केलेल्या योजना व कामांची माहिती व त्याची प्रत्यक्ष तुलना करून बघून नेमका संविधानाचा योग्य वापर व दलित वंचितांच्या विकासासाठी झालेली कामे याबाबत सविस्तर चर्चा होत आहे.अनेकदा अशा चर्चेनंतर झालेली फसवणूक ही समाज बांधवांच्या उपासकांच्या लक्षात आल्यामुळे समाज बांधवांकडून त्याबाबत आश्चर्य व आता उघडलेल्या डोळ्यांमुळे अत्यंत आनंद व्यक्त केला जात आहे.यात्रेमध्येजवळ पास अडीचशे पेक्षा अधिक संघटना सहभागी आहेत व यात्रेत आलेले सर्व प्रमुखवक्ते महाराष्ट्रा तील कानाकोपऱ्यातून आलेले आहेत व सतत सलग महिनाभर यात्रा चालणार आहे.याबद्दल समाजामध्ये कौतुक होत आहे.यात्रेमध्ये अॕड. वाल्मीकराव निकाळजे, विजयराव गव्हाणे, नागसेन पुंडगे,योजनाताई ठोकळे,स्नेहाताईभालेराव, शिवाजीराव गायकवाड, संतोष गवळी असे विविध मान्यवर उपस्थित आहेत.

Post a Comment

0 Comments