Type Here to Get Search Results !

केज शहरामध्ये लवकरच होणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा केज नगरपंचायतच्या बैठकीत एकमताने केला ठराव मंजूर जिल्हाधिकारी यांच्याकडे सदर प्रस्ताव पुढील कारवाईसाठी सादर

 केज शहरामध्ये लवकरच होणार श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा 


केज नगरपंचायतच्या बैठकीत एकमताने केला ठराव मंजूर 


जिल्हाधिकारी यांच्याकडे सदर प्रस्ताव पुढील कारवाईसाठी सादर



केज/प्रतिनिधी


केज शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे नुतनीकरणासह सुशोभीकरण व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा ठराव केज नगरपंचायत कार्यालयात दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये मांडण्यात आला होता. 

सदर ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांचेकडे सदर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 

केज नगरपंचायतने घेतलेल्या या विशेष भूमिकेबद्दल  शिवप्रेमी व मराठा मावळ्यांनी आनंद व्यक्त करत केजमधे मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हस्ते नगरपंचायतच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड  व जनविकास परिवर्तन आघाडीचे  प्रमुख हारुणभाई इनामदार यांचा लवकरच सत्कार करण्याची तयारी केज तालुक्यातील शिवप्रेमी व मराठा बांधवांडून सुरु असल्याचे समजते.

केज शहरामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा यावा अशी मागणी अनेक वर्षांपासून  शिवप्रेमी मागणी करत आहेत. 

या मागणीचा आदर करत केज नगरपंचायतची सत्तासुत्रे सक्षमपणे सांभाळत असलेले जनविकास परिवर्तन आघाडीचे  प्रमुख हारुणभाई इनामदार यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे नुतनीकरणासह सुशोभीकरण व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा प्रस्ताव नगरपंचायतच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये ठेवला. हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांच्या या भूमिकेला उपस्थित सर्वच नगरसेवकांनी सहमती दर्शवली आणि एकमताने सदर ठराव मंजूर करण्यात आला आहे. यामुळे नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड, हारुणभाई इनामदार यांच्यासह  सर्व नगरसेवकाचे या भूमिकेचे शिवप्रेमी व सकल मराठा समाजाकंडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे. या चौकाच्या नुतनीकरणासह सुशोभीकरणाचे काम लवकरच सुरू होईल. व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा देखील या ठिकाणी येणाऱ्या काळात होण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. या विशेष कामाबद्दल शिवप्रेमी व मराठा समाजाकडून मराठा आरक्षण योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हस्ते लवकरच नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड व जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार यांचा सत्कार करण्याची तयारी सुरू असल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments