Type Here to Get Search Results !

केज तालुक्यात चोरांचा सुळसुळाट आज येवता शिवारात शेळ्याचे चोरी करून चोर पसार तर कानडी माळी येथे चार चाकी गाडीसह पाच जण ताब्यात सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन चोरांना घेतले ताब्यात

 केज तालुक्यात चोरांचा सुळसुळाट 

आज येवता शिवारात शेळ्याचे चोरी करून चोर पसार तर कानडी माळी येथे चार चाकी गाडीसह पाच जण ताब्यात

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन चोरांना घेतले ताब्यात




केज/प्रतिनिधी


केज तालुक्यात गेल्या आठ-दहा दिवसापासून चोरांचा सुळसुळाट चालू आहे. गेल्या अनेक दिवसापासून रात्रीच्या वेळी ड्रोन प्रत्येक गावातून फिरवले होते व आज चक्क कानडी माळी येथे  चार चाकी गाडीसह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. 

तर त्यांच्याजवळील इतर शस्त्र जप्त करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे राजू वाघमारे चंद्रकांत काळकुटे नितीन जाधव होमगार्ड बाळू थोरात विजय वनवे हे तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन सदर चोरांना ताब्यात घेतले.  पोलीस प्रशासन पुढील तपास करीत आहेत. सदर चोरांचे नावे  कळले नाही परंतु केज पोलीस ठाण्यात कारवाई करण्याचे काम उशिरापर्यंत चालू आहे.

Post a Comment

0 Comments