Type Here to Get Search Results !

केज विधानसभा मतदार संघात ईच्छुकांची भाउगर्दी उमेदवारांचा गावोगावी भेटी देण्याचा धडाका मतदार ऐनवेळी उगवलेल्या उमेदवारांना कौल देणार ? विद्यमान आमदाराविषयी जनतेत तिव्र नाराजीचा सुर

 केज विधानसभा मतदार संघात ईच्छुकांची भाउगर्दी उमेदवारांचा गावोगावी भेटी देण्याचा धडाका 

मतदार ऐनवेळी  उगवलेल्या उमेदवारांना कौल देणार ? विद्यमान आमदाराविषयी जनतेत तिव्र नाराजीचा सुर



केज /प्रतिनिधी 


केज विधानसभा मतदार संघात अनेकदा ईच्छुक उमेदवारांची भाउगर्दी झालेली असुन ग्रामीण भागातील कार्यक्रमांना भेटी देण्यासाठी ईच्छुक उमेदवारांनी धडाका लावला आहे.परंतु मतदार ऐनवेळी वेगवेगळ्या राजकीय पक्षात प्रवेश करत मलाच उमेदवारी मिळणार असल्याचे सांगत आहेत.तसेच विद्यमान आमदार नमीता मुंदडा यांच्याविषयी केज मतदार संघात तिव्र नाराजी असल्याचे चित्र दिसत आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा समाजाचा पाठिंबा आपल्यालाच मिळावा म्हणून प्रयत्न करताना दिसत आहेत.केज मतदार संघामध्ये सर्वच पक्षांनी आपल्या पक्षाला केज विधान सभेची जागा मिळावी म्हणुन दावा केला  आहे.नुकत्याच घेतलेल्या काँग्रेस कमेटीच्या बैठकीत    काँग्रेसचे केजतालुकाध्यक्ष  

श्री.प्रविण खोडसे यांनी देखील सदरील जागा काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी अशी मागणी केली आहे.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडुन बहुजन विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष रमेश तात्या गालफाडे,माजी आमदार पृथ्वीराज साठे,अंजली घाडगे व ईतर काही जण दावा करत आहेत.भाजप पक्षाकडुनही अनेक जण ईच्छुक असुन ऐनवेळी आपले पत्ते उघडण्याच्या तयारीत आहेत.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या डाॕ.नयना सिरसट यांनी शिवसेनेत प्रवेश करताना बीड येथीलसभेत मा.मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शब्द दिलेला आहे. तसेच मनसे पक्षही आपला उमेदवार देणार आहे.महायुती मध्ये सध्या तणावाचे वातावरणअसुन ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार यांचाही उमेदवार येण्याची शक्यता  नाकारता येत नाही.अजुन ईच्छुक उमेदवारांची यादी गुलदस्त्यात असुन ऐनवेळी बरेचसे उमेदवार पहावयास मिळणार आहेत.परंतु नवख्या उमेदवारांना जनता स्विकारणार काय अथवा आगामी काळात काय घटना काळाच्या पोटात दडलेल्या आहेत हे आगामी काळात दिसुन येईल.

Post a Comment

0 Comments