Type Here to Get Search Results !

मैदानी खेळामुळे आरोग्य निरोगी रहाते. -अॕड.उद्धव कराड.

 मैदानी खेळामुळे आरोग्य निरोगी रहाते.  -अॕड.उद्धव कराड.



केज/प्रतिनिधी 


महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय,बीड जिल्हा परिषद व गट शिक्षण कार्यालय केज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शालेय मुलांची कबड्डी स्पर्धा येथील साने गुरुजी निवासी विद्यालय केज येथे स्पर्धेचे उद्घाटन अॕड. उद्धवराव कराड यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी श्री.कराड म्हणाले की,विद्यार्थ्यांनी अभ्यासा प्रमाणे खेळाकडे ही लक्ष द्यावे खेळामुळे आरोग्य तर तंदुरुस्त राहतेच परंतु खेळामुळे अनेक पर्याय निर्माण झाले आहेत जिद्द आणि चिकाटी वृत्तीने जे खेळाडू खेळतात त्या खेळाडूंना शासनाने अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत.शासकीय नोकरीत पाच टक्के आरक्षण देऊन जे राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट खेळतात त्या खेळाडू करिता शासकीय सेवेत अधिकारी ही बनता येते असे खेळाडूंना मार्गदर्शन केले या प्रसंगी  शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कविता गिते मॅडम उपस्थित होत्या.केज तालुका क्रीडा संयोजक श्री.विनोद गुंड यांनी प्रास्ताविक केले या स्पर्धेला श्री.बरडे सर, गिरी सर,नागरगोजे सर, श्री,सानप सर श्री,पठाण सर,श्री.पटाईत सर, श्री.तोंडसे सर,श्री.पवार सर,श्री.कांबळे सर,श्री. शेवाळे सर श्री.कोरडे सर, यांनी पंच म्हणून काम केले.यावेळी सहशिक्षक श्री.शिंदे सर श्री.कोथिंबीरे सर,गिरी मॅडम,वर्षे मॅडम उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील या स्पर्धेत तीस संघाने सहभाग नोंदविला.

Post a Comment

0 Comments