Type Here to Get Search Results !

सोन्याच्या पावलाने आलेल्या गौराईचे सुवासिनींनी केले स्वागत. विवीध आरास करत गोडधोडाचा दिला नैवेद्य.

 सोन्याच्या पावलाने आलेल्या गौराईचे सुवासिनींनी केले स्वागत.

विवीध आरास करत गोडधोडाचा दिला नैवेद्य.



केज/प्रतिनिधी 


सोन्याच्या पावलांनी आलेल्या गौराईचे सुवासीनींनी स्वागत करुन विवीध प्रकारची आरास करुन गोडधोडाचा नैवेद्य दाखवुन स्वागत केले. भाद्रपद महिन्यातील शुद्ध सप्तमीला गौरीचेआवाहन करुन सुवासीनी महीला त्यांच्याआगमनाचे स्वागत करतात.भाद्रपद शुद्ध अष्टमीला गौराईला पंच पक्वान्नाचा नैवेद्य दाखवुन   त्यांचा सन्मान केला जातो यावेळी मखर सजवुन मखरामध्ये विवीध प्रकार ची आरास केली जाते.या वेळी महीला वर्गाकडुन विवीध खेळाचे प्रकार सादर करुन माहेरवासीनी गौराई आगमनाचा उत्सव साजरा केला जातो. भाद्रपद शुद्ध नवमीला नैवेद्य दाखवुन हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेऊन महीला आनंदोत्सवसाजरा करतात.व गौराईला निरोप  देतात.यावेळी महीला वर्गा कडुन त्यांच्यातील सुप्त गुणांना वाट मोकळी केली  जाते.अशा रितीने गौरी गणपती सण उत्साहात साजरा केला जातो.

Post a Comment

0 Comments