Type Here to Get Search Results !

केज तालुक्यातील आनंदगाव येथे सामुदायिक आरोग्य शिबिर संपन्न.

 केज तालुक्यातील आनंदगाव येथे सामुदायिक आरोग्य शिबिर संपन्न.



केज/प्रतिनिधी


राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत उप मुख्य मंत्री यांच्या समन्वयातून स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय रुग्णालय,जन औषधी  वैदकशास्त्र विभाग अंबाजोगाई व मानवलोक यांच्या संयुक्त विद्यमाने केज तालुक्यातील आनंदगाव येथे दिनांक १३ सप्टेंबर २०२४ रोजी मोफत आरोग्य तपासणी व औषध उपचार शिबिर घेण्यात आले.या शिबिरा साठी औषधउपचारासाठी लागणारे औषधे गोळ्या साहित्य मानवलोक संस्थे कडून उपलब्ध करून देण्यात आले.या कार्यक्रमाची सुरुवात सरपंच सौ.अंजनाताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली.डॉ.राजेश संबुरवाड,डॉ.गणेशलोखंडे,डॉ.मोहिनी जोगदंड तर विद्यार्थी डॉ.गणेश युसलीवार,डॉ.सुमेध,डॉ. अतुल कदम,डॉ.माधव दुभळकर,डॉ.अपूर्वा,डॉ. रुचिता सातपुते,डॉ. अभारा मिर्झा,समाजसेवा अधीक्षक बाळासाहेब कोठुळे,अशोक वाघोळे, आधिपरिचारक दशरथ घुले,मानवलोक आरोग्य विभाग प्रमुख डॉ.ज्योती डबडे,जयश्रीशिर्के,काजल मुंडे शिबिर सेवा कार्यात सहभाग नोंदवला.यावेळी गावातील दोनशेहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करून औषध उपचार करण्यात आले.जेष्ठ नागरिकांचा यामध्ये विशेष सहभाग होता.गावातच आरोग्य तपासणी व औषधउपचार झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शिबीर यशस्वीतेसाठी डॉ.हनुमंत सौदागर,नागेश वैरागे,विठ्ठल गावरस्कर आदींनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments