Type Here to Get Search Results !

जय हनुमान गणेश मंडळा च्या वतीने सारणी आनंदगाव येथे रक्तदान शिबिर संपन्न,रक्तदात्यास एक फळाचे झाड दिले भेट


 जय हनुमान गणेश मंडळा च्या वतीने सारणी आनंदगाव येथे रक्तदान शिबिर संपन्न,रक्तदात्यास एक फळाचे झाड दिले भेट.


केज/प्रतिनिधी 


केज तालुक्यातील सारणी आनंदगाव येथील जय हनुमान गणेश मंडळाच्या वतीने वेगळा सामाजिक उपक्रम हाती घेत गावात रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले.या शिबिराचा शुभारंभ सरपंच संतोष (बप्पा) सोनवणे व उपसरपंच रवि बापू सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला.गणेश उत्सवात सद्या डिजे कडे तरुणांचा मोठा ओढाआहे मात्र यामध्ये असेही काही तरुण व गणेश मंडळ आहेत ते आपली सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळेसामाजिक उपक्रम घेत असतात असाच उपक्रम केज तालुक्यातील सारणी आनंदगाव येथील जय हनुमान गणेश मंडळाच्या वतीने सारणी येथे घेण्यात आला.शनिवार दि.१४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी गावातील हनुमान मंदीरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.यामध्ये जवळपास २८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान करण्याऱ्या व्यक्तींना एक फळाचे झाड भेट देण्यात आले व हे झाड जपल्यास मंडळाच्या वतीने त्या रक्त दात्याना एक हजार रुपयाचे बक्षीस देखील देण्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे झाड देऊन त्याचे संगोपन देखील करा असा सल्लाच यावेळीमंडळाच्या वतीने देण्यात आला. 

यावेळी सारणी आनंदगाव चे उपसरपंच रवि सोनवणे यांच्यासह अनेक रक्त दात्यांनी रक्तदान केले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी विशाल सोनवणे,सुसेन सोनवणे, अक्षय सोनवणे,अशोक सोनवणे,लखन सोनवणे यांच्यासह अनेक तरुण यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments