Type Here to Get Search Results !

पाडळसिंगी परिसरात १८ नव्या कोऱ्या तलवारी पोलिसांनी घेतल्या ताब्यात;आरोपींना केले जेरबंद

 पाडळसिंगी परिसरात १८ नव्या कोऱ्या तलवारी पोलिसांनी घेतल्या ताब्यात;आरोपींना केले जेरबंद



गेवराई/प्रतिनिधी


अवैध मार्गाने विक्री साठी आणलेल्या १८ नव्या कोऱ्या तलवारी गेवराई पोलीसांनी सापळा रचून आरोपीसह ताब्यात घेऊन मोठी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. दिनांक १४  सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ३-०० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी आरोपीला शिताफीने अटक करून १८ तलवारी जप्त केल्या आहेत.  सदर कारवाईमुळे सर्व स्तरावरून पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केले जात आहे.

कायदा सुव्यवस्था मध्ये बाधा निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांनी सांगितले आहे. सदर अवैध हत्यारे विक्री करणे व ते विकत घेणे कायद्याने गुन्हा आहे. या मार्गाने जाणाऱ्यांवर पोलीसांची करडी नजर असल्याची माहिती दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भगवान फकीरा पवार हा अवैध मार्गाने तलवारी आणून विक्री करत असल्याची माहिती पोलीसांना एक गुप्त खबर मार्फत मिळाली होती. पोलीस अधिकारी आरोपीचा पिच्छा करीत होते. मात्र, आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. लोकेशन मिळत नव्हते. शनिवारी आरोपीचे लोकेशन मिळाल्यानंतर पोलीसांनी सापळा रचून आरोपीसह आरोपीच्या ताब्यातील १८ नव्या कोऱ्या तलवारी, दुचाकी वाहन जप्त जेरबंद केली आहे. पोलीसांनी केलेल्या कारवाईने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.नीरज राजगुरु यांना मिळालेल्या गोपनिय माहितीने, गेवराई येथील पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांनी दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी रात्रीच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर त्रिमुर्ती हॉटेल जवळ पाडळसिंगी टोलनाक्याजवळ सापळा रचून आरोपी भगवान फकीरा पवार वय ४० वर्षे रा. हिरापुर ता. गेवराई जि. बीड  यास मुद्देमालासह ताब्यात घेतले आहेत. सपोनि दिपक लंके यांच्या फिर्यादीवरुन कलम ४/२५ आर्म अँक्ट १९५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविपोअ नीरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराईचे पोनि. प्रविणकुमार बांगर, सपोनि दिपक लंके, सपोनि संतोष जंजाळ, सपोनि सचिन कापुरे, पोउपनि शिवाजी भुतेकर, अशोक शेळके, श्रीमंत उबाळे बन, सुरेश पारधी, कडाजी मदने, रामेश्वर काकडे, परळकर, तांदळे, विकास सांळुके, रेंगे बन, श्रीधर सानप, अंगद पिंपळे, विजय परजणे, प्रल्हाद देवडे, रामनाथ उगलमुगले, सुनिल राठोड, महेद्र ओव्हाळ, प्रदिप पिंपळे, होमगार्ड कांबळे, अनिल ढाकणे, महिला होमगार्ड शर्मा, कोकाट, शितल सोळुंके यांनी कारवाई केली आहे. सदरील गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अधिकारी डॉ. शिवाजी भूतेकर करीत आहेत. आरोपी कधी आणि कुठून अवैध मार्गाने तलवारी आणतो आणि विक्री करतो. या संदर्भाने गेवराई पोलीस कसून शोध घेणार आहेत. पोलीसांची करडी नजर असून, गुन्हेगारांची खैर नाही. अशी चर्चा होऊ लागली आहे.

Post a Comment

0 Comments