Type Here to Get Search Results !

भीम शक्ती संघटनेचे मराठवाडा संघटक श्री. चंद्रकांत खरात सर यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा.

 भीम शक्ती संघटनेचे मराठवाडा संघटक श्री. चंद्रकांत खरात सर यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा.



केज/प्रतिनिधी


भीमशक्ती संघटनेचे मराठवाडा संघटक श्री. चंद्रकांत खरात सर यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करून उपजिल्हा रुग्णालय केज येथे रुग्णांना फळ वाटप करण्यातआले.सामाजिक,राजकीय,शैक्षणिक, पत्रकारीता इत्यादी क्षेत्रा तील मान्यवरांनी भीमशक्ती संघटनेचे मराठवाडा संघटक श्री. चंद्रकांत सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या आहेत. 

केज तालुक्यात सह बीड  जिल्ह्यामध्ये श्री.चंद्रकांत खरात सर हे गेले २५ ते ३० वर्षापासून दलित चळवळीमध्ये काम करत आहेत.एक लढाऊ कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे तसेच त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.श्री. चंद्रकांत खरात सर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी विविध उपक्रम राबवून वाढदिवस हा अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला.उपजिल्हा रुग्णालय केज येथील रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दत्ताञय केंद्रे,भीमशक्ती संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष डॉ.अमरेंद्र विद्याघर,डॉ. शेरखाने,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब मस्के,युवा नेते वीरेंद्र बनसोडे,सुनील धिमधिमे,बंजारा नेते बाळासाहेब आडे, मराठवाडा संघटक श्री. चंद्रकांत खरात सर, नितीन शिंदे,नवनिर्वाचित केज शहराध्यक्ष शिवमुर्ती हजारे,पत्रकार तात्या गवळी,प्रदीप गायकवाड, युवानेते प्रीतम खरात यांच्यासह भीमशक्ती संघटनेचे कार्यकर्ते व उप जिल्हा रुग्णालय केज येथील डॉक्टर,कर्मचारी उपस्थित होते.स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने भिमशक्ती संघटनेचे मराठवाडा संघटक श्री. चंद्रकांत खरात सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना स्वाभिमानी पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,सचिव तात्या गवळी,कोषाध्यक्ष विवेक बनसोड,प्रसिद्धी प्रमुख प्रदीप गायकवाड, विजय बिक्कड,वंचितचे केज तालुकाध्यक्ष बाबासाहेब मस्के,शरद धीवार इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments