Type Here to Get Search Results !

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहणासह मुख्यमंत्र्यांच्या सर्व कार्यक्रमावर स्वातंत्र्य सैनिकांचा बहिष्कार

 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहणासह मुख्यमंत्र्यांच्या सर्व कार्यक्रमावर स्वातंत्र्य सैनिकांचा बहिष्कार


 

छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी 

शासन एकीकडे सर्व घटकांना लाभाच्या घोषणा करत आहे. दुसरीकडे ज्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागामुळे सत्तेमध्ये आणि प्रशासनामध्ये असलेले स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या पाल्यावर अन्यायकारक निर्णय घेत आहेत. शासन सेवेतील 5000 पेक्षा अधिक स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना कमी करण्याचा अघोरी अन्यायकारक निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या पाल्याने छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय कार्यालयासमोर स्वातंत्र्य सैनिक कन्या शोभा राजपूत यांनी अन्नपाणी त्याग आंदोलन 14 सप्टेंबर पासून सुरू केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या मुख्य ध्वजारोहणासह सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या पाल्यांनी घेतला आहे. 



Post a Comment

0 Comments