Type Here to Get Search Results !

अंबाजोगाई येथील घुगे हाॕस्पिटल येथे २डी इको तपासणी शिबीर संपन्न.

 अंबाजोगाई येथील घुगे हाॕस्पिटल येथे २डी इको तपासणी शिबीर संपन्न.



अंबाजोगाई /प्रतिनिधी 


दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम,घुगे हार्ट अँड क्रिटिकल केअर हॉस्पिटल अंबेजोगाई,रोटरी क्लब ऑफ अंबेजोगाई,आय एम ए ऑफ अंबेजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने  घुगे हॉस्पिटल अंबेजोगाई येथे २-डी इको तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबीर हे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक आर.बडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उल्हास गंडाळ,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश चव्हाण,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शेख रौफ,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.सचिन शेकडे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एल आर तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.उपजिल्हा रुग्णालय केजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय केंद्रे यांच्या शुभ हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. 

शिबिराकरिता बालाजी हॉस्पिटलचे बाल ह्रदयरोग तज्ञ डॉ.भूषण चव्हाण व श्री.अमीत मिश्रा यांनी अंबेजोगाई,परळी,केज व किल्लेधारूर तालुक्यातील एकूण १३० लाभार्थ्यांची २ -डी इको तपासणी केली.त्यामध्ये २७ लाभार्थ्यांना ह्रदय रोग शस्त्रक्रिया करिता पात्र ठरवले गेले.त्यांच्यावर लवकरच बालाजी हॉस्पिटल मुंबई येथे मोफत ह्रदय शत्रक्रिया करण्यात येणार आहेत. 

हे शिबिर यशस्वी करण्या साठी घुगे हार्ट अॕण्ड क्रिटिकल केअर युनिटचे संचालक डाॕ.नवनाथ घुगे, अंबाजोगाई,केज,परळी व किल्लेधारूर तालुक्यांतील आरबीएसकेचे वैधकीय अधिकारी,आरबीएसकेचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक श्री.रमेश तांगडे,सर्व कर्मचारी तसेच जिल्हा परिषद शाळेतील संबंधित शिक्षक यांचे अमूल्य सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments