Type Here to Get Search Results !

मागील पाच वर्षे बेपत्ता असलेले अनेक इच्छुक हे केज विधानसभेच्यालागले तयारीला इच्छुकांच्या भाऊगर्दी मध्ये निष्ठावंताचे काय? मतदारांचा सवाल येणाऱ्या केज विधानसभा निवडणुकीमध्ये दलित समाजाचा आमदार निवडून आणण्यासाठी पक्ष व संघटना लागल्या कामाला.

 मागील पाच वर्षे बेपत्ता असलेले अनेक इच्छुक हे केज विधानसभेच्यालागले तयारीला

इच्छुकांच्या भाऊगर्दी मध्ये निष्ठावंताचे काय? मतदारांचा सवाल

येणाऱ्या केज  विधानसभा निवडणुकीमध्ये  दलित समाजाचा आमदार निवडून आणण्यासाठी पक्ष व संघटना लागल्या कामाला.



केज/प्रतिनिधी


केज विधानसभा मतदार संघात मागील पाच वर्षे बेपत्ता असलेले अनेक इच्छुक उमेदवार हे केज विधानसभेच्या तयारीला लागले आहेत तर इच्छुकां च्या भाऊ गर्दीमध्ये निष्ठावंताचे काय?असा सवाल मतदारातून उपस्थित केला जात आहे तर तसे चित्र केज मतदार संघामध्ये सध्या पाहावयास मिळत आहे. 

येणाऱ्या केज राखीव विधानसभेच्या निवडणुकी मध्ये दलित समाजाचा आमदार निवडूनआणण्या साठी अनेक दलित पक्ष व संघटना कामाला लागल्या आहेत.केज विधानसभा मतदार संघ राखीव आरक्षीत असण्याची ही शेवटची निवडणूक आहे त्यामुळे शेवटी तरी दलीत समाजाचा आमदार व्हावा असे दलित संघटनेच्या नेत्यातून चर्चा ऐकण्यास मिळत आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की,केज विधानसभा मतदार संघ हा गेल्या अनेक वर्षापासून अनुसूचित जाती या प्रवर्गाला राखीव सुटलेला आहे.गेल्या पंचवीस वर्षापासून केज मतदार संघामध्ये स्व.विमलताई मुंदडा व त्यांच्या सून विद्यमान आमदार नमिता ताई मुंदडा यांचे वर्चस्व राहिले आहे.तसेच स्व. विमलताई मुंदडा यांच्या निधनानंतर अडीच वर्षे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी केज मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. 

माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांचा २०१४ ते २०१९ पर्यंत पाच  वर्षे त्यांचा कार्यकाल राहिला. त्यांच्या कार्यकाळामध्ये केज मतदार संघात बहुतांश विकास कामे झाली आहेत.संगीता ठोंबरे यांचा कार्यकाळात जी कामे मंजूर झालेली आहेत तीच कामे विद्यमान  आमदार करत आहेत असा आरोप ठोंबरे यांनी एका पत्रकार परिषदेत केला आहे.२०१९ मध्ये आमदार नमिताताईमुंदडा, त्यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा,पती अक्षय मुंदडा यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला रामरामठोकत भाजपामध्ये ऐनवेळी  निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश केला व त्या भाजपाच्या कमळ या चिन्हावर निवडून आल्या परंतु निवडून आल्यानंतर फारसा विकास केलेला दिसुन येत नाही.एसटी बसडेपोसाठी महामंडळा ची स्वतःची जागा असताना सुद्धा पञक सोशल मिडीयावर टाकुन नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करुन श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असे नागरिकातून बोलले जात आहे व मुंदडा यांनीत्यांच्या मोजक्याच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालतआहेत असाही जनसामान्यातून आरोप केला जात आहे. त्यामुळे विद्यमान आमदार नमिताताई मुंदडायांच्यावर  मतदार नाराज असल्याचा नागरिकांतून सूर निघत आहे.माजी आमदार सौ. संगीताताई ठोंबरे यांना डावलून भाजपाने विद्यमान आमदारांना ऐनवेळी तिकीट देऊन निवडून आणले होते.त्या नंतर ठोंबरे या गेल्या पाच वर्षांमध्ये मतदार संघात कुठेच फिरकलेल्या नाहीत परंतु सध्या त्याही निवडणूक लढवण्याच्या भूमीकेवर ठाम आहेत. 

माजी आमदार पृथ्वीराज साठे यांचा २०१९ मध्ये पराभव झाला होता. पराभवा नंतर पृथ्वीराज साठे हे सतत केज मतदार संघात विविध कार्यक्रमास व गाव भेटी तसेच काही प्रमाणात नागरिकांच्या प्रश्नावर आंदोलन करताना दिसून आले.साठे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असून त्यांनी जनसामान्यात जाऊन संपर्क मोठ्या प्रमाणात जुळवल्याचे दिसून येत आहे.हा जनसंपर्क येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या कामी पडेलकाय? पक्षश्रेष्ठी त्यांना उमेदवारी देतील काय? असाही प्रश्न  उपस्थित केला जात आहे. 

सध्या मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगेपाटील यांच्या यांच्याकडून उमेदवारी मिळावी म्हणून व शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मिळावी अनेक इच्छुकांची भाऊ गर्दी असल्याचे पाहावयास मिळत आहे.भाजपाकडून विद्यमान आमदार नमिता ताई मुंदडा,माजी आमदार संगीताताई ठोंबरे या दावा करत आहेत परंतु ठोंबरे या आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांची व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र  पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील व शरदपवार यांची आणि ओबीसीचे हाके यांची भेट घेऊन उमेदवारी मागत आहेत. तसेच शेतकरी,महिला, नागरिक,विद्यार्थी यांच्या प्रश्नावर मागील पाचवर्षात संगीताताई ठोंबरे व विद्यमान आमदार यांनी एकही प्रश्न मार्गी लावला नाही अथवा त्यावर आवाज उठवला नाही असेही सर्व सामान्यातून बोलले जात आहे. 

लोकसभेला खा.बजरंग सोनवणे यांना अनेक इच्छुकांनी मदत केली  असे म्हणत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये माजी आमदार पृथ्वीराज साठे,गोकुळ जाधव, विजयकुमार वाव्हळ,रमेश तात्या गालफाडे,रोहिदास मस्के,डॉ.अंजली घाडगे यांच्या सह अनेक जण इच्छुक आहेत.परंतु सर्व इच्छुक हे पुणे-मुंबई यासह अनेक ठिकाणी आपले व्यवसाय थाटलेले आहेत शेतकरी व नागरिकांच्या प्रश्नावर यांनी मागील पाच वर्षात केव्हा आवाज उठवला आहे का व त्यांनीशेतकरी, महिला,नागरीक, विद्यार्थी यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात एखादे आंदोलन केले आहे काय?असेही नागरिकांतून बोलले जात आहे.शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर त्यांच्या पक्षात फक्त साठे यांच्यानंतर एकही कार्यकर्ता अथवा नेता निदर्शनास येत नव्हता परंतु अचानक काय चमत्कार घडला व एवढे मोठे इच्छुक कार्यकर्ते तयार झाले असा सवाल मतदारातुन उपस्थितकेला जात आहे.उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या डॉ. नयनाताई शिरसाट, बाबुराव पोटभरे,रिपाईचे पप्पू कागदे,यशवंत उजगरे,इंजिनीयर शिंदे यांच्यासह मातब्बरइच्छुक हे केज मतदार संघामध्ये गुडघ्याला बाशिंग बांधून फिरताना दिसत आहेत. मात्र केज येथे एसटी आगार,व्यापारी संकुल, औद्योगिक वसाहत, क्रीडांगण,उद्यान यासह विविध योजना अद्यापही राबविण्यात आलेल्या नाहीत यावर विद्यमान आमदारासह इच्छुक उमेदवार व इतर लोक प्रतिनिधी हे चकार शब्द देखील काढत नाहीत असे नागरिकांतून बोलले जात आहे.शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षांमध्ये अनेकांनी भाऊ गर्दी केली आहे त्यामध्ये फक्त डॉ. अंजली घाडगे यांनी अधिकृत पक्षप्रवेश केला आहे तर शरद पवारयांच्या राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडल्याचे निदर्शनास येत असल्याच्या चर्चा आता जोरदार रंगू लागल्या आहेत.माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या मागे पक्षाचा एक मोठा गट व जन्म सामान्य नागरिकांचा समुदाय असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे डाॕ.अंजलीताई घाडगे यांच्या पाठीमागे खासदार बजरंग सोनवणे यांचे आजी,माजी पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, सरपंच यांच्यासह बजरंग सोनवणे यांचे कार्यकर्ते दिसून येत आहेत. त्या वरून असे चित्र सध्या तरी दिसू लागले आहे की, शरद पवार यांच्या पक्षात दोन गट पडले त्यामुळे साठेंना उमेदवारी मिळेल काय असा सवाल जनते तून विचारला जात आहे. 

तसेच गेले अनेक वर्षा पासून केज मतदार संघ हा अनुसूचित जाती या प्रवर्गाला राखीव सुटलेला असला तरी मात्तबर पक्षांनी अद्यापही दलित उमेदवार दिलेला नाही "जय भीम पेक्षा रामराम बरा "आहे म्हणून दलित उमेदवार अद्यापहीनिवडून आणला नाही असाआरोप दलित चळवळीतील कार्यकर्त्यातून केला जात आहे.२०२९ मध्ये केज मतदार संघ हा राखीव उठणार असल्यामुळेसध्या दलित नेतेही अग्रेसर झाले आहेत.यावेळेस आपलाच उमेदवार निवडून आणायचा आहे यापूर्वी मनभर नेत्यांनी दलितांचा वापर करून घेतला आहे व दलिताला अद्यापही न्याय दिला नाही अशाही उलट सुलट चर्चांना सद्या उधान आलेले आहे.गेले ३० ते ३५ वर्षापासून अनेक सामाजिकसंघटना, महिलांच्या विविध प्रश्रां सह राजकारणात स्वतःचे अस्तित्व निर्माण करत सध्या केज नगरपंचायत च्या नगराध्यक्षा पदावर विराजमान असलेल्या नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यादेखील केज विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी दावेदार आहेत.सौ.सिताताई बनसोड यांनी आजपर्यंत केलेले सामाजिक, राजकीय कार्यासह इतर पद भूषवून केलेल्या कामाच्या व त्यांच्यासोबत दलित,ओबीसी,मराठा या सह इतर समाजाच्या नेत्यांची फौज मोठ्या प्रमाणात आहे व त्यांनी काही दिवसांपूर्वी आरक्षण योद्धा मनोज जरांगेपाटील यांची भेट घेऊन उमेदवारी ची मागणी केली आहे.सौ. सिताताई बनसोड यांच्या उमेदवारीसाठी केज मतदार संघामध्ये तिसरी आघाडी पर्याय ठरूशकते. 

जर शरदचंद्र पवार यांच्या पक्षातून साठे किंवा घाडगे भाजपाकडून विद्यमान आमदार मुंदडा किंवा माजी आमदार ठोंबरे, तिसरी आघाडी म्हणून बनसोड यांची उमेदवारी  निश्चित झालीतरभविष्यात यांच्यात सरळ लढतहोईल हे येणाऱ्या काळात चित्र स्पष्ट होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.तसेच दलित समाजाचा आमदार निवडून आणण्यासाठी दलित नेते कामालालागले असल्यामुळे अनेक मातब्बर लोकप्रतिनिधीची डोकेदुखी वाढली आहे असाही तर्क नागरिकांतून लावला जात आहे.अजुन भाजप कडुनही नवीन उमेदवार ईच्छुक असुन ऐनवेळी कोणता उमेदवार  आणला जातो हे पहाणेही उत्सुकतेचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments