Type Here to Get Search Results !

केज नगरपंचायत कडून शहरातील मेन रोडवरील पथदिव्याचे उद्घाटनसंपन्न विविध अडचणीवर मात करत केज वासियांच्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल - नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड. यापुढे संबंधित कंपनीच्या गुत्तेदारावर विसंबून न राहता आमच गाव आमच काम आमच्या गावाचा विकास ; एक पाऊल केजच्या विकासाकडे वाटचाल -हारूणभाई इनामदार.

 केज नगरपंचायत कडून शहरातील मेन रोडवरील पथदिव्याचे उद्घाटनसंपन्न

  विविध अडचणीवर मात करत केज वासियांच्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल - नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड.

यापुढे संबंधित कंपनीच्या गुत्तेदारावर विसंबून न राहता आमच गाव आमच काम आमच्या गावाचा विकास ; एक पाऊल केजच्या विकासाकडे वाटचाल -हारूणभाई इनामदार.



केज/प्रतिनिधी


केज नगरपंचायत कडून शहरातील मुख्य रस्त्यावरील पथदिव्याचे उद्घाटन करून प्रत्यक्षात पथदिवे चालू केले आहेत.

यावेळी जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड,नगरपंचायतचे मुख्याधिकारी सचिन देशपांडे,जनविकास परिवर्तन आघाडीचे नेते दिलीप गुळभिले, सामाजिक कार्यकर्ते हनुमंतभोसले,नगरसेवक, पत्रकार बांधव व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवुन पथदिव्याचे उद्घाटन करण्यात आले. 

विविध अडचणीवर मात करत जनविकासपरिवर्तन आघाडीच्या व नगर पंचायतच्या माध्यमातून आम्ही दिलेला शब्द पूर्ण करून केज वासियांच्या स्वप्नपूर्ती कडे वाटचाल करीत आहोत असे माध्यमाशी बोलताना नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांनी म्हटलेआहे. 

यापुढे संबंधित कंपनीच्या गुत्तेदारावर विसंबून न राहता आमच गाव आमच काम आमच्या गावाचा विकास ; एक पाऊल केज च्या विकासाकडे वाटचाल करत आहोत तसेच दलित वस्तीचा निधी हा नियमा नुसार दलित वस्ती मध्येच वापरला आहे.केज शहरा च्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना हारूणभाई इनामदार यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.पुढे बोलताना नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड व हारुणभाई इनामदार म्हणाले की,गेले तीन ते चार वर्षापासून शहरातील रस्त्याचे कामे चालू होते ते अद्यापही पूर्ण कामे सदर कंपनीने केलेले नाहीत सदर दोन्हीही कंपनीच्या नाकर्तेपणामुळे केज वासियांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे.सदर दोन्हीही कंपनीने अद्यापही रीतसर पथदिव्याचे काम केज  नगरपंचायतकडे वर्ग केले नाही.फक्त आवक जावक ला एक पत्र एचपीएम कंपनीने दिले आहे.रीतसर  वरिष्ठाच्या आदेशाने नगर पंचायतकडे सदर कामवर्ग करून देणे गरजेचे होते परंतु सदर कंपनीने तसे केले नाही.त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आम्ही केज वासीयांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी व आज रोजी गणेश विसर्जनाच्या दिवशी लाईट मुळे गैरसोय होऊ नये म्हणून तात्काळ लाईट चालू केली आहे. तसेच यापुढे सदरगुत्तेदारा कडे पाठपुरावा करून उर्वरित सर्व कामेलवकरच पूर्ण करणार आहोत. तसेच यापुढे सदर कंपनी च्या गुत्तेदारावर विसंबून न राहता आम्ही आमचे गाव आमचं काम आमच्या गावाचा विकास करण्या साठी कट्टीबद्ध आहोत आम्ही केज शहराच्या विकासासाठी एक पाऊल पुढे वाटचाल करतआहोत असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.केज शहरातील दलितवस्तीच्या विकास कामावरबोलताना इनामदार म्हणाले की, शहरात ज्या ठिकाणी दलित समाज राहत आहे त्या ठिकाणची समाज कल्याण अधिकारी यांची एनओसी असल्याशिवाय विकास कामाला मान्यता मिळत नाही आम्ही केज नगरपंचायतच्या माध्यमा तून रीतसर परवानगी घेऊनच काम करतआहोत तसेच यापुढेही शहरात ज्याज्या ठिकाणी दलित समाज बांधव राहतात त्या त्या ठिकाणचा विकास करणे हे आमचे कर्तव्य आहे.यापुढेही दलित समाज बांधव राहतआहेत त्या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे विकास कामे करणार आहोत. 

केज नगरपंचायतच्या माध्यमातून नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड व हारूणभाई इनामदार,  मुख्याधिकारी सचिन देशपांडे व त्यांच्या सर्व टीमने सदर कामाची तात्काळ दखल घेऊन गणेश विसर्जनाच्या पूर्व संध्येला केज शहरातील मुख्य रस्त्यावरील पथदिवे चालू केल्याबद्दल समस्त केज वासियांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी आभार व्यक्त करून त्यांचे कौतुक केले.पुढे बोलताना हनुमंत भोसले म्हणाले की,उर्वरित राहिलेले काम हे संबंधित गुतेदाराशी संपर्क करून लवकरात लवकर करण्यात येईल व  सदर गुत्तेदार हे उर्वरित काम लवकर पूर्ण करणार आहे.तसेच शहरातील मुख्य रस्त्यावरील सर्व ठिकाणचे पथदिवेसुरळीत चालू करण्यात येणार आहेत.तसेच केज नगर पंचायतच्या अंतर्गत येणाऱ्या कामास नगर पंचायत सहकार्य करीत आहे.यावेळी जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई  इनामदार, नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड,नगरपंचायतचे मुख्याधिकारी सचिन देशपांडे,दिलीप गुळभिले, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले,गटनेते राजूभाई इनामदार, नगरसेवक जलालभाई इनामदार नगरसेवक सुमेध बप्पा शिंदे,गुत्तेदार एजाजभाई शेख,पत्रकार बांधव,केज नगरपंचायतचे नगरसेवक,कर्मचारीआणि जनविकास परिवर्तन आघाडीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments