Type Here to Get Search Results !

निश्चयाचा महामेरु मनोज जरांगे पाटील - प्रा.गणेश चाळक.

 निश्चयाचा महामेरु मनोज जरांगे पाटील - प्रा.गणेश चाळक.



महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकसंख्या असलेली मराठा ही जात काळाच्या ओघात मागे पडली.मोठे पणाच्या खोट्या कल्पना वर यांनी जीवन जगले व यातून येणारे उत्पन्न अपुरे पडू लागले.जागतिकी करणाच्या प्रक्रियेत आरोग्य,शिक्षण व इत्यादी सुविधा घेणे महाग झाले. येणारे उत्पन्न आणि महागड्या सुविधा यांचा मेळ घालणे कठीण झाले यातून मराठा जातीस शिक्षण व नौकरी मध्ये आरक्षणाची गरज निर्माण झाली.ही गरज अनेक मराठा पुढाऱ्यांनी ओळखली पण मतांचे राजकारण हा प्रश्न आपण लावून धरला तर इतर ओबीसी प्रवर्गातील लोक आपणास मतदान करणार नाहीत व आपल्या हातून सत्ता जाईल या भीतीपोटी घाणेरडे राजकारण करण्यात आले.सत्ता संपादन करण्यासाठी मराठा पुढाऱ्यांनी या प्रश्नाकडे जाणून बुजून डोळेझाक केले अशातच हा प्रश्न घेऊन कै. अण्णासाहेब पाटील यांनी प्रथम मराठा आरक्षणास वाचा फोडली.जातीयवादी ही टीका सहन न झाल्याने या प्रश्नावर त्यांची पहिली आत्महत्या झाली नंतर अण्णासाहेब जावळे पाटील,विनायकराव मेटे व अनेक लहान-मोठे मराठा तरुण या प्रश्नावर खर्ची झाले अनेक तरुण मुलांनी या प्रश्नावर आपले बलिदान दिले पण सरकार च्या हृदयात मायेचा पाझर फुटला नाही म्हणूनच या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या क्षितिजावर मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने मराठा समाजास एक हिरा मिळाला गेली २५ वर्षाचा मराठा आरक्षणासाठी असलेला अखंड संघर्ष ते करत आहे मराठा समाजास फसवे आरक्षण नको तर ते ओबीसी प्रवर्ग यातूनच मिळवून देणार असाच निश्चय त्यांनी केला कितीही कष्ट लागले, कितीही यातना सोसाव्या लागल्या तरी हे आरक्षण मिळवणारच जीव गेला तरीही चालेल ही त्यांची जिद्द व चिकाटी आहे. त्यांच्या चिकाटीस व जिद्दीस तमाम मराठा समाज हा सलाम करू लागला आहे व खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे आपल्या समाजाचा विकास व ओबीसीतून आरक्षण फक्त म्हणजे फक्त मनोज जरांगे करू शकतो की मराठा समाजाची भावना झाली आहे म्हणून सकल मराठा समाज यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे.पंगत चुकली तर एक वेळेसचे जेवण चुकते पण संगत चुकली तर आयुष्याची दिशा चुकते यासाठी योग्य माणसाबरोबर असणे गरजेचे असते या भावने तून सकल मराठा समाज म्हणून जरांगे यांच्या पाठीशी आहे इतर पक्ष संघटना सर्व स्वातंत्र्या पासून मराठ्यांनी पाहिले आहे सर्व पक्षाकडून मराठ्यांची फसवणूक झाली ही जात लढवय्या जात असून बराच वेळ प्रत्येक पक्षाबरोबर लढण्यात गेला आता एकमेव अशा जरांगे पाटील म्हणून मराठा समाज मनोज जरंगे पाटील यांच्या पाठीमागे आता लोकशाहीच्या उत्सवात उभा राहिला लोकसभेला ताकद दाखवली आता विधानसभा दृष्टिक्षेपात दिसू लागले आपल्या विचारांची माणसे देऊन त्यांना निवडून आणणे व त्यांच्याकडून मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण मिळवून घेणे हे त्यांचे अंतिम उद्दिष्ट आहे जरांगे जातीयवादी आहेत ते मंत्र्यांना शिव्या देतात त्यांच्यामागे कोणीतरीआहे अशा अनेक टीकाटिप्पणी झाल्या तरी त्या टिकेस न घाबरता व आपल्यावर झालेल्या टीकेला घाबरू

नका कारण टीकेला जो टिकतो तोच खरा या जगात टिकतो असा आत्मविश्वास उराशी बाळगून त्यांची वाटचाल सुरू मराठ्यांना ओबीसी तून आरक्षण मिळवण्या साठी जीवाची परवा न करता आमरण उपोषण नाकातून रक्त येईपर्यंत कित्येक वेळा केले सभा संमेलने,मोर्चे,बैठका,रॅली धोंगडी बैठका या सर्व लोकशाहीच्या हत्याराचा वापर करून देखील सरकारला जाग आली नाही म्हणून नाइलाजाने लोकशाहीतील उत्सवात कोणाला तरी म्हणजेच प्रश्न सोडवणारा निवडून आणण्याची भाषांनी जन्म घेतला सदर प्रकरण हाताळताना त्यांनी आपल्या संसाराची घरदाराची परवा न करता समाजासाठी सतत परिश्रम घेणारा एकमेव मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील असून आरक्षण मिळवून देण्याच्या विषयाचा मेन महामेरू असून तो सकल मराठा समाजाचा आधारू आहे व त्याचे हे प्रयत्न पाहून अपयश आले तरी पुन्हा नव्या उमेदीने नवा कार्यक्रम ट्राय अगेन म्हणून त्यांचे हे परिश्रम त्याच ळवळीत मोलाचे आहेत.त्यांचे हे परिश्रम व्यर्थ जाणार नाही हा आशावाद 


परिश्रम से आज के हारे

कल के विजेता होंगे


प्रा.गणेश चाळक 

व.क.म.केज.

Post a Comment

0 Comments