Type Here to Get Search Results !

ग्रामपंचायत कार्यालय सारोळा (मा) येथे एक दिवसीय आर्थिकसाक्षरता मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

 ग्रामपंचायत कार्यालय सारोळा (मा) येथे एक दिवसीय आर्थिकसाक्षरता  मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.



वाशी/प्रतिनिधी 


वाशी तालुक्यातील सारोळा (मा) येथे एक दिवसीय वित्तीय साक्षरता कार्यक्रम संपन्न झाले.

भारत सरकारच्या राष्ट्रीय वित्तीय शिक्षा केंद्र (एन. सी.एफ.ई.)च्या माध्यमा तून एक दिवसीय आर्थिक साक्षरता मार्गदर्शन कार्यक्रम ग्रामपंचायत सारोळा (मा) येथे दि.१६ सप्टेंबर २०२४ रोजी ग्रामपंचायत कार्यालया च्या माध्यमातूनआयोजित करण्यात आले.या एक दिवसीय कार्यक्रमांमध्ये आर्थिक साक्षरतेचे महत्व समजावुन सांगण्यातआले सर्वसाधारणपणे ग्रामीण भागातील जनतेमध्ये वित्तीय साक्षरतेचा अभाव दिसुन येतो याअभावामुळे बऱ्याच वेळेस केंद्र सरकारच्या,महाराष्ट्र सरकारच्या असलेल्या विविध योजना तसेचपोस्ट ऑफिस,राष्ट्रीयकृत बँके मधील असलेल्या विविध योजना सामान्य जनते  पर्यंत पोंहोचत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेमध्ये वित्तीय साक्षर तेचे प्रमाण कमी आढळून आलेआहे.देशातीलप्रत्येक नागरिकांमध्ये वित्तीय साक्षरता अधिक प्रमाणात निर्माण होऊन प्रत्येकाने एक श्रीमंत आणि समृद्ध असे नागरी जीवन जगावे तसेच फसव्यायोजनांमध्ये आपला अनमोल असा घामाचा,कष्टाचा,पैसा गुंतवून बऱ्याच प्रमाणात पॉन्जी स्कीम (अर्थात फसवणूक करणाऱ्या) योजनांच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केली जाते ही फसगत टाळावी यासाठी भारत सरकारच्या भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्ड (सेबी ) व राष्ट्रीय वित्तीय शिक्षा केंद्र (एन.सी.एफ.ई.)चे वित्तीय प्रशिक्षक (फायनान्शिअल ट्रेनर) श्री.गणेश चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

शासनाच्या विविध योजनां वर त्यांनी सारोळा (मा) येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून ग्रामस्थांना पोस्ट ऑफिस तसेच राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असलेल्या बचतीच्या, विम्याच्या,पेन्शनच्या असलेल्या विविध योजना व त्यांचे फायदे ग्रामस्थांना समजावून सांगितले व या योजनांच्या माध्यमातून आर्थिक प्रगती व आर्थिक व्यवस्थापन कसे चांगल्या पद्धतीने होऊ शकते याचे मार्गदर्शन केले तसेच म्युच्युअल फंड सारख्या सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या योजनेचे देखील मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर आयुष्यमान भारत सारख्या आरोग्य विषयक योजनेचे देखील मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांना खबरदारीच्या सूचना ही देण्यात आल्या.ऑनलाइन फ्रॉड व फसव्या योजना कशा पद्धतीच्या असू शकतात? तसेच कमी वेळेमध्ये अधिक परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या पॉन्जी स्कीम्स कशा असू शकतात व त्या पासून कसे सावध राहायचे ? याचे देखील मार्गदर्शन व खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या.हाकार्यक्रमयशस्वी रित्या पार पाडण्यासाठी ग्रा.सारोळा (मा) च्या  सरपंच सौ.शालनताई डोईफोडे उपसरपंच,इतर ग्रामपंचायत सदस्य यांनी परिश्रम घेतले तसेच या शिबीराला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार आश्रुबा डोईफोडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments