Type Here to Get Search Results !

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केज तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा.

 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केज तालुक्यात  विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा.




केज/प्रतिनिधी


मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केज तालुक्यात  विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजराकरण्यात आला.मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा हा उत्सव दरवर्षी दि.१७ सप्टेंबर या दिवशीशासकीय कार्यालये शाळा व विवीध आस्थापनामध्ये साजरा केला जातो.आपला भारत देश दि.१५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला पण भारतात अनेक संस्थाने होती.त्यामध्ये हैदराबाद हे एक निजामाचे संस्थान होते.ते भारतात सामील होण्यास तयार नव्हते निजाम हे मराठवाडा येथील लोकांवर खूप जुलुम अत्याचार करीत होते.या अन्यायाविरुध्द स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्ती संग्रामचा लढा सुरू केला. वंदे मातरम् चळवळीद्वारे अनेक विदयार्थ्यांनी मराठवाडा मुक्त करण्या साठी प्रयत्न केले.या लढ्यात अनेक लोक सामील झाले.या लढ्यात महिलांनीही महत्वाची कामगिरी बजावली पण तरीही निजाम शरण येत नव्हता.शेवटी भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी दि.१३ सप्टेंबर १९४८ रोजी ऑपरेशन पोलो ही कारवाई सुरु केली.याला पोलिस अॕक्शन या नावाने  संबोधले गेले.यामध्ये निजामाचा पराभव झाला. व दि.१७ सप्टेंबर १९४८ रोजी निजाम शरण आला आणि मराठवाडा स्वतंत्र झाला.म्हणुन १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.तसेच मराठवाड्यातील सर्व शासकीय कार्यालये,शाळा  व विवीध आस्थापना या ठिकाणी ध्वजारोहण करून हा उत्सव साजरा केला जातो.त्याचाच एक भाग म्हणून केज तहसील कार्यालय,अतिरिक्तजिल्हा  न्यायालय,पंचायत समिती कार्यालय,नगरपंचायत कार्यालय,उपजिल्हा रुग्णालय,तालुका कृषी कार्यालय,सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय,पोलीस ठाणे, बँका यासह शाळा, महाविद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व इतर कार्यालयात तसेच केज नगरपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांच्या हस्ते करण्यात आले तर येवता येथील जिल्हा परिषद प्राथमिकशाळा,माध्यमिक शाळा, व ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात मराठवाडामुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण सरपंच विलास आप्पा जोगदंड यांच्या हस्ते करण्यात आले तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण मुख्याध्यापक गित्ते सर यांच्या हस्ते करण्यात आले व माध्यमिक शाळेचे शिक्षक जोगदंड सर व वाघमारे सर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सर्व शिक्षक गण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments