Type Here to Get Search Results !

सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या पथकाची पाटोदा शहरांमध्ये मटका बुकीवर व ऑनलाईन बिंगो चक्री जुगारावर धाडसी कारवाई ४३ हजार ९० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस केले गजाआड

 सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या पथकाची पाटोदा शहरांमध्ये मटका बुकीवर व ऑनलाईन बिंगो चक्री जुगारावर धाडसी कारवाई


४३ हजार ९० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस केले गजाआड



केज/प्रतिनिधी


सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या पथकाची पाटोदा शहरांमध्ये मटका बुकीवर व ऑनलाईन बिंगो चक्री जुगारावर धाडसी कारवाई करुन

४३ हजार ९० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस  गजाआड केले आहे. 

 याबाबतची सविस्तर माहिती अशी की, दिनांक २५सप्टेंबर २०२४ रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांना एका गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, पाटोदा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कल्याण नावाचा जुगार व ऑनलाईन बिंगो चक्री जुगार काही इसम हे स्वतःच्या फायद्यासाठी खेळत व खेळवीत आहेत. 

सदर मिळालेल्या खात्रीलायक माहितीवरून सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या पथकातील कर्मचारी यांना सदर ठिकाणी छापा मारण्याचे आदेश देण्यात आले होते. 

त्यांच्या पथकातील दिलीप गीते प्रकाश मुंडे सहदेव मेत्रे यांनी सदर ठिकाणी जाऊन अधिक चौकशी केली असता त्या ठिकाणी मटका व जुगार खेळला व खेळवली जात असल्याचे खात्री झाल्यानंतर सदर ठिकाणी छापा मारून एकूण ४३हजार ९० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून ऑनलाईन चक्री चालवणारा मालक भरत जाधव,सदर चक्री चालवतअसलेला गाळा मालक बप्पा बावणे, चक्री चालवण्यासाठी आयडी पुरवणारा आयडी मालक चव्हाण रा.धाराशिव तसेच तीन मटका घेणारे एजंट व त्यांचा मटका घेणारा मालकअशा एकूण सात आरोपीवर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ बीड अप्पर पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या आदेशावरून नमूद पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments