Type Here to Get Search Results !

साबला येथील सरपंच सौ.जनाबाई काकडे यांचा सत्कार सोहळा संपन्न.

 साबला येथील सरपंच सौ.जनाबाई काकडे यांचा सत्कार सोहळा संपन्न.



केज/प्रतिनिधी


केज तालुक्यातील मौजे साबला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेत "मराठवाडा मुक्ती संग्राम दिन " साजरा करण्यात आला.यावेळी  मुख्याध्यापक व शालेय समिती अध्यक्ष यांच्या हस्ते महात्मा गांधी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी रामानंद तीर्थ, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहन करण्यात आले.तसेच सरपंच पती आदर्शशिक्षक नरहरी शहाजी काकडे,व सरपंच सौ.जनाबाईनरहरी काकडे ग्रामपंचायत कार्यालय साबला यांना दक्ष मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्रराज्य यांच्यावतीने राजर्षी शाहू महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार २०२४ हा पुरस्कारमिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.व ग्रामविकास अधिकारी श्री.धनराज सोनवणे पंचायत समिती केज, उपसरपंच सौ.कचराबाई राजेंद्र सरवदे यांचाही सत्कार शालेयव्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साबला  यांच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.धनंजय धाट  मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साबला,प्रमुख पाहुणे  अध्यक्ष श्री.शंकरराव नाईकनवरे,शालेय व्यवस्थापन समिती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साबला उपाध्यक्ष  श्रीमान नरहरी सरवदे, स्विकृत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ,शिक्षक प्रतिनिधी  श्रीमती वंदना फाटे, सदस्या श्रीमती अर्चना काकडे,श्रीमती निता काकडे,सदस्य श्री. अविनाश सरवदे,श्री.सादू परळकर यांच्या प्रमुख  उपस्थितीतसत्कारसोहळा संपन्न झाला.सौ.जनाबाई नरहरी काकडे या मौजे साबला गावच्या सरपंच पदावर विराजमान झाल्या पासून त्यांनी साबला या गावात वेगवेगळी विकास कामे,गावात स्वच्छता अभियान राबवणे,आरोग्य शिबीराचे आयोजनकरणे, तसेच गावातील जनतेला वेगवेगळया योजना मिळवून देणे,गावातील जनतेच्या सुख दुःखात सहभागी होणे त्यांच्या अडीअडचणी सोडवणे  गावात विकास कामे राबवणे इत्यादी कार्यात त्या नेहमी सहभागी असतात यामुळेच त्यांना त्यांच्या कामाची पावती  म्हणून हापुरस्कारमिळाला असल्यामुळे त्यांचासत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमान लक्ष्मण काकडे यांनी तर आभार प्रदर्शन उमाशंकर शिंदे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments