Type Here to Get Search Results !

शेतकरी गटांना वृक्ष लागवडीसाठी फळांच्या रोपाचे मोफत वाटप,रोपे लागवड करून त्याचे संवर्धन करावे -संतोष शिनगारे

 शेतकरी गटांना वृक्ष लागवडीसाठी फळांच्या रोपाचे मोफत वाटप,रोपे लागवड करून त्याचे संवर्धन करावे -संतोष शिनगारे


.



केज/प्रतिनिधी 


बीड जिल्ह्यातील केज, धारूर,बीड,अंबाजोगाई व आष्टी तालुक्यातील सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धे अंतर्गत आयोजित गटशेतीद्वारे आपले उत्पन्न वाढवणाऱ्या व खर्च कमी करणाऱ्या गटांना चालना देण्यासाठी पाणी फाउंडेशन व सेट्रिज संस्थे अंतर्गत गटशेतीकरणाऱ्या ज्या गटांनी खड्डे खोदले आहेत अशा पाचतालुक्या तील ३२ गटातील १७५ पेक्षा जास्त शेतकऱ्याना ८५०० रोपे लागवड करण्यासाठी देण्यात आले फळझाडे यामध्ये आंबा, चिकू,मोसंबी,संत्रा,लिंबू,सिताफळ,जांभूळ,पेरू इत्यादी फळाच्या रोपे देण्यात आले असल्याची माहितीपानी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक संतोष शिनगारे यांनी दिली.शेतकऱ्यांनी लागवड केलेली रोपे जगवावीत असे आवाहन करण्यात आले. शेतकऱ्यांना समृद्ध व आर्थिक दृष्टीने सक्षम करण्याचा हा एकछोटासा प्रयत्न सुरु आहे.गटाने योग्य नियोजन करून व्यवस्थित रोपाची लागवड करावी,कुजलेल्याशेणखत,लिंबाचा पाला, बायोमिक्स,गांडूळखत, ट्रायकोड्रामा याचा वापर करून खडा बुजवावा व रोप लागवड करावी असे आवाहन पानी फाऊंडेशन चे मास्टर प्रशिक्षक रवींद्र पोमने,विनोद ठोंबरे, सेट्रिज प्रतिनिधी चैतन्य जोशी,विवेक वानखेडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments