Type Here to Get Search Results !

चिंचोलीमाळीचे भुमीपुञ अॕड.सुभाष राऊत यांचा अभुतपुर्व जंगी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.

 चिंचोलीमाळीचे भुमीपुञ अॕड.सुभाष राऊत यांचा अभुतपुर्व जंगी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.




केज /प्रतिनिधी 


महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाच्या अध्यक्ष पदावर राज्यमंञी दर्जा अॕड.सुभाष राऊत यांची निवड झाल्या बद्दल दि.८ सप्टेंबर २०२४ रविवारी चिंचोलीमाळी येथे नागबेट चौकातुन अॕड.सुभाष राऊत यांची सजवलेल्या बैलगाडीतुन ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणुक काढण्यात आली. ठिकठिकाणी महीलांनी आरतीओवाळुन  औक्षण केले.हजारोंच्या संख्येने नागरीकरस्त्याच्या दुतर्फा उभे राहुन स्वागत करीत होते.पुढील चौकात  जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली.अॕड सुभाष राऊत यांनी छञपती शिवाजी महाराज,संत सावता महाराज,श्री नामदेव महाराज यांना हार अर्पण करुन दर्शन घेतले.त्या नंतर ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार समारंभ पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जेष्ठ नेते सुनील आबा गलांडे हे उपस्थीत होते. तर प्रमुखपाहुणे श्री.माधव तात्या निर्मळ,डाॕ.वसुदेव नेहरकर,भगवान केदार, विष्णु भाऊ घुले, शिवसेनेचे दादासाहेब ससाणे,भीमशक्तीचे चंद्रकांत खरात सर, टी.डी.राऊत,पञकार चंद्रकांत पाटील,डी.डी. बनसोडे, श्रीमती संजीवनी राऊत,अॕड.डी.टी.सपाटे,सचीन राऊत,दत्ता गोंदणे, शेख अजिमोद्दीन मेजर व माजी सैनीक संघटनेचे पदाधिकारी,सरपंच धनंजय देशमुख,अॕड. दिलीप वनवे,मालोजी नाना गलांडे तसेच परिसरातील सरपंच,सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन,सदस्य तसेच परिसरातील जेष्ठ नागरीक   व मान्यवर यावेळी उपस्थीत होते.यावेळी सत्काराला उत्तर देताना अॕड.सुभाष राऊत यांनी आपला जीवनपट उघडुन समाज सेवा करण्याची संधी मिळाल्या बद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस,अजीत दादा पवार तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानले.या पदाला आपण योग्य न्याय देण्यासाठी कटीबद्ध असुन अडचणी सोडविण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सुञ संचालन व प्रास्ताविक मेजर राम राऊत यांनी केले.तसेच या कार्यक्रमात   विवीध क्षेत्रात निवड झालेल्या युवकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments