Type Here to Get Search Results !

दलित जोडो अभियानातंर्गत पँथर सेनेचा केजमध्ये उद्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन दिपक केदार करणार मार्गदर्शन ; तालुकाध्यक्ष समाधान बचुटे यांच्या संपर्क कार्यालयाचे होणार उद्घाटन

 दलित जोडो अभियानातंर्गत पँथर सेनेचा केजमध्ये उद्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन


दिपक केदार करणार मार्गदर्शन ; तालुकाध्यक्ष समाधान बचुटे यांच्या संपर्क कार्यालयाचे होणार उद्घाटन  




केज/प्रतिनिधी


ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या आदेशाने राज्यभरात दलित जोडो अभियान कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने केजमध्ये उद्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला दिपक केदार मार्गदर्शन करणार आहेत.तसेच याप्रसंगी पँथर सेनेचे केज तालुकाध्यक्ष समाधान बचुटे यांच्या संपर्क कार्यालयाचे केदार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

आजही दलित समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय-अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या अन्याया विरोधात पँथर दलितांचा हुकार बनून पुढे आली. ही दलितांच्या मान- सन्मान- स्वाभिमानाची फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारी चळवळ असून ऑल इंडिया पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक केदार यांनी महाराष्ट्रातील तमाम दलित बांधवांच्या हक्क अधिकारांसाठी राज्यभरात दलित जोडो अभियानाला सुरवात केली. त्या अनुषंगाने दिनांक३० सप्टेंबर२०२४  रोजी  सकाळी ११-०० वाजता केज शहरातील केज-बीड रोडलगत कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास दिपक केदार मार्गदर्शन करणार आहेत.यावेळी विनोद भोळे, अशोक घडवे पाटील,जीवन गायवकवाड, अक्षय भुंबे,नितीन सोनवणे,मिनाताई लोंढे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.तसेच याप्रसंगी पँथरचे केज तालुकाध्यक्ष समाधान बचुटे यांच्या संपर्क कार्यालयाचे दिपक केदार यांच्या हस्ते थाटामाटात उद्घाटन केले जाणार आहे.तरी कार्यक्रमास दलित समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समाधान बचुटे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments