Type Here to Get Search Results !

साबला येथील सरपंच सौ.जनाबाई काकडे यांचा छञपती राजर्षी शाहू महाराज महाराष्ट्र आयडॉल या पुरस्कार देऊन सन्मान.

 साबला येथील सरपंच सौ.जनाबाई काकडे यांचा  छञपती राजर्षी शाहू महाराज महाराष्ट्र आयडॉल या पुरस्कार देऊन सन्मान.



केज /प्रतिनिधी 


केज तालुक्यातील साबला येथील महिला सरपंच सौ.जनाबाई काकडे यांचा  छञपती राजर्षी शाहु महाराष्ट्र आयडाॕल पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले आहे या बाबत सविस्तर माहीती अशी की,पुणे येथील दक्ष मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने छञपती राजर्षी शाहू महाराज महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.ना. मुरलीधर अण्णा मोहोळ केंद्रिय हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री भारत सरकार तसेच शिवानी नाईक,मराठी अभिनेत्री (अप्पी आमची कलेक्टर) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यासत्कार सोहळ्याचे आयोजक श्री. भगवान रामचंद्र श्रीमंदिलकर संस्थापक अध्यक्ष छञपती राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठाण तथा संपादक,जागृत शोध   यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच सौ.जनाबाई नरहरी काकडे,साबला यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार यांचा सन्मान करण्यात आला. पुणे येथे हा सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी ग्रामविकास अधिकारी श्री.धनराज सोनवणे,ग्रामपंचायत सदस्य सौ.प्रतिभा काकडे, ज्ञानेश्वर पांचाळ तसेच आदर्श शिक्षक नरहरी काकडे,पोपट काक, तानाजी आंडिल,हनुमंत परळकर,बालाजी जाधव, सौ.पुजा पांचाळ,सौ. स्वप्नाली जाधव,सौ. रूपाली परळकर,सौ. अनुराधा आंडिल आदी जण यासत्कार सोहळ्यास उपस्थीत होते.दरम्यान या सत्काराने आपण प्रभावित झाले असुन अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली  अशी प्रतिक्रिया सरपंच सौ.जनाबाई काकडे यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

Post a Comment

0 Comments