Type Here to Get Search Results !

बीड जिल्ह्याच्याविकासात हरित महामार्ग भर टाकणार,खा.बजरंग सोनवणेंच्या पत्राला केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरींचा हिरवा कंदील

 बीड जिल्ह्याच्याविकासात 

हरित महामार्ग भर टाकणार,खा.बजरंग सोनवणेंच्या पत्राला केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरींचा हिरवा कंदील



केज/प्रतिनिधी


दळणवळण सोयीस्कर होण्यासाठी सुरत-चेन्नई हरित महामार्ग प्रकल्प भारत सरकार अंतर्गत बांधला जात आहे.हा प्रस्तावित महामार्ग महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर,बीड, धाराशिव आणि सोलापूर अशा पाच जिल्ह्यांमधून जातो आहे.त्यामुळे बीड जिल्ह्यातून गेलेल्या महामार्गांना सुरत-चेन्नई हरित महामार्ग जोडला गेल्यास त्याचा फायदा होईल.त्याचबरोबर मराठवाड्याचा दुष्काळी भाग परराज्यांना जोडला जाईल.त्यामुळे दळण वळण करण्यास चालना मिळेल.अशा मागणीचे पत्र खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना दिले होते. त्या पत्राला त्यांनी हिरवा कंदील दाखविला आहे.

बीडचे खा.बजरंगसोनवणे यांनी भारत सरकार प्रस्तावित सुरत-चेन्नई रहित महामार्ग संदर्भात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना पत्र दिले होते. त्यामध्ये त्यांनी मागणी केली होती की,बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून सुरत-चेन्नई हरित महामार्ग जात आहे मात्र बीड जिल्हामुख्यालय ठिकाणापासून लांब अंतरावर आहे.या प्रकल्पा मध्ये अरणगाव तालुका जामखेड येथे वाहने चढण्यास व उतरण्यास सुविधा देण्यात आली आहे.या ठिकाणापासून जामखेड-खर्डा-चौसाळा- माळेगाव येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ ला सुपर दिला गेला तर मराठ वाड्याच्या दळणवळणा ला अधिक चालनामिळेल. अविकसित मानल्या जाणाऱ्या भागाला विकासाची जोड निर्माण होईल.तसेच चौसाळा येथे बीड जिल्हा मुख्यालय ठिकाणाला जोडला जाईल.त्यामुळे केज, माजलगाव,धारूर येथील रस्त्यांचे जाळे तयार होईल अशी मागणी केली होती.

सुरत-चेन्नई महामार्ग हा साळेगाव येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ पासून नांदूरघाट पुढे चौसाळा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ येडशी छत्रपती संभाजी नगरला जोडून पुढे खरडा ते दिघोळ फाटा,पैठण पंढरपूर पालखी मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ इतरला जोडून जामखेड अरणगाव येथून अंदाजीत लांबी ८६ किमी होईल.यामधील काही किलोमीटर लांबीचे रस्ते हे राष्ट्रीय महामार्ग दर्जाचे आहेत व काही लांबीचे रस्ते हे राज्य महामार्ग असून त्यांना राष्ट्रीय महा मार्गाचा दर्जा देऊन ते त्याचे रुंदीकरण हे दोन लेन पेव्हड शोल्डरमध्ये करावे.कारण बीड शहर व बीड जिल्ह्यातील केज, धारूर,माजलगाव तालुक्यासाठी सुपर कनेक्टिव्हिटीचे काम करेल अशी कनेक्टिव्हिटी तयार झाल्याने मराठवाड्यातील मागास मानल्या जाणाऱ्या भागाला विकसित होण्या साठी मदत होईल आणि हा भाग राज्याशी जोडला जाईल.अशी मागणी खा. बजरंग सोनवणे यांनी केली होती.त्या मागणीला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दाखविला आहे.त्यामुळे बीडच्या विकासात आणखीनच भर पडली जाणार आहे.

Post a Comment

0 Comments