Type Here to Get Search Results !

बसमध्ये चढताना १ लाख ४१ हजाराचे दागिने पळविले,केजबसस्थानका वर घडलेली घटना.

 बसमध्ये चढताना १ लाख ४१ हजाराचे दागिने पळविले,केजबसस्थानका वर घडलेली घटना.



केज/प्रतिनिधी                       


महालक्ष्मीच्या सणासाठी मुळ गावी धारूरला आलेली महीला शुक्रवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या दरम्यान केज बसस्थानकावरूनछत्रपती संभाजीनगर बस मध्ये चढत असतानाप्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने,व नगदी रोख रक्कम मिळुन१लाख ४१ हजार रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शुक्रवारी केज बसस्थानकावर घडली आहे.छत्रपती संभाजीनगर येथील घृष्णेश्वर सोसायटीत  राहणा-या मयुरी स्वरुप कंकाळ या महालक्ष्मीच्या सणासाठी मुळगावी धारूरला आल्या होत्या. सण संपल्यानंतरशुक्रवारी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या दरम्यान त्या केज बसस्थानकावरुन छत्रपती संभाजीनगरला जाणा-या बसमध्ये चढत आणताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन  अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवलेल्या छोट्या पर्समध्ये ठेवलेले ५ तोळे सोन्याचे पट्टी गंठण ,जुन्या वापरातील २ सोन्याच्या  अंगठ्या व नगदी रोख १ हजार ७०० रुपये मिळुन एकुण १ लाख ४१ हजार ७०० रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या प्रकरणी मयुरी स्वरुप कंकाळ यांच्या फिर्यादीवरून केजपोलीस   ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध शुक्रवारी राञी गुन्हा नोंद झाला असुन पोलीस  निरीक्षक श्री. प्रशांत  महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस  नाईक त्रिंबक सोपणे हे पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments