Type Here to Get Search Results !

वक्रतुंड गणेश मंडळाचे रक्तदान शिबीर संपन्न १८ रक्तदात्यांनी केले रक्तदान

 वक्रतुंड गणेश मंडळाचे रक्तदान शिबीर संपन्न १८ रक्तदात्यांनी केले रक्तदान




केज/प्रतिनिधी 


वक्रतुंड गणेश मंडळाचे १६ वे रक्तदान शिबीर संपन्न झाले यावेळी केज उपजिल्हा रुग्णालयाची टीम उपस्थित होती.

वक्रतुंड गणेश मंडळ हे मागील १५वर्षे सामाजिक आध्यत्मिक,वैज्ञानिक परंपरा जपत आलेली आहे.वक्रतुंड गणेश मंडळाचे १६ वे वर्ष आहे. याही वर्षी आपली परंपरा जपून तुलसी रामायण कथा चालू आहे दररोज दोन ते पाच रामकथा सोबत इतरही कार्यक्रम चालू असतात याचाच भाग म्हणून दि.१० सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी १० ते १ यावेळी  रक्तदान शिबीर घेण्यात आले.यावेळी केज उप जिल्हा रुग्णालयाचे नागरगोजे श्रीकिशन यांची रक्त संकलन टीमउपस्थित होती.यावेळी १८ रक्त दात्यांनी रक्तदान केले तर पहिल्यांदा रक्तदानकरणारे पाच नवीन तरुणांनी रक्तदान केले धनंजय कुलकर्णी,अभिजितअंधारे,शुभम अंधारे,अथर्व कुलकर्णी,वैभव काळदाते   सागर चाळक,मस्के हेमंत, नवनाथ जाधव,शिवमबडे, शंकर कसबे,संजयकोरडे, सुमित पन्नमवार,प्रसाद वैरागे,सुमित राऊत,राहुल एखंडे,काशिनाथ गोरे, सोहम राऊत,सचिनकवळे या रक्तदात्यानी रक्तदान केले.पहिल्यांदा रक्तदान करणारे अथर्व कुलकर्णी, वैभव काळदाते,सोहम राऊत,सुमित राऊत, काशिनाथ गोरे यांनी प्रथमच रक्तदान केले. यावेळी रक्त संकलन साठी आलेली टीम डॉ. ओंकार भालेराव,डॉ. तन्मयी वैद्य,डॉ.रिया बागडे,संतोष गायकवाड, नितीन सोळंके,सतीश गायकवाड व श्रीकिशन नागरगोजे उपस्थित होते. 

वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने सर्व टीमचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments