Type Here to Get Search Results !

No title

 केज तहसील कार्यालयावर दलित अन्य अत्याचार निर्मूलन समितीने केले निदर्शने

मिलिंद एकबोटे यांना केज शहरात येण्यास बंदी घालण्यात यावी



येवता येथील ॲट्रॉसिटी ॲक्ट  गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी



केज/प्रतिनिधी



मिलिंद एकबोटे यांना केज शहरात येण्यास बंदी घालण्यात यावी  या मागणीसाठी केज   तहसील कार्यालयावर दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहेत तसेच येवता येथील ॲट्रॉसिटी ॲक्ट  गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी  या मागणीचे लेखी निवेदन तहसीलदार केज यांना देण्यात आले आहे. 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, दिनांक ४ सप्टेंबर रोजी मिलिंद एकबोटे हे केज शहरात येणार आहेत त्यांना केज शहरात येण्यास बंदी घालण्यात यावी म्हणून दिनांक३१ ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले होते त्या अनुषंगाने दिनांक २ सप्टेंबर रोजी कसल्याही प्रकारचे गालबोट न लागता मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने निदर्शने संपन्न झाले आहेत असे आम्ही जाहीर करतो. तसेच चार तारखेला होणाऱ्या मोर्चाला आमचा कसलाही विरोध नसून त्या दिवशी जर कसलाही अनुसूचित प्रकार झाला तर त्याच्याशी आमचा कसलाही संबंध नाही असे निदर्शने करून दलित अत्याचार निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार केज यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे. तसेच केज तालुक्यातील येवता येथील ॲट्रॉसिटी या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे तसेच आज रोजी आम्ही केलेले आंदोलन हे समाप्त होत आहे याची शासनाने नोंद घेण्यात यावी असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

या लेखी निवेदनावर अशोक गायकवाड,लखन हजारे,सुमित, शिंदे बाळासाहेब ओव्हाळ,धीरज मस्के,योगेश गायकवाड,अनिकेत समुद्रे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सदर निवेदन हे केज तहसीलचे प्रभारी तहसीलदार सचिन देशपांडे यांनी स्वीकारले आहे.

Post a Comment

0 Comments