Type Here to Get Search Results !

केज विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी वर वंचित बहुजन आघाडी ची आढावा बैठक संपन्न.

 केज विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी वर वंचित बहुजन आघाडी ची आढावा बैठक संपन्न.



केज/प्रतिनिधी


केज विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी वर वंचित बहुजन आघाडी ची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह केज येथे संपन्न झाली.वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशावरून बीड जिल्ह्या तील प्रत्येक विधानसभा निहाय बैठकाचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृह केज येथे वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक घेण्यात आली आहे.सध्या विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत त्या अनुषंगाने सदर बैठक पार पडली.या बैठकीत एससी एसटी,ओबीसी आरक्षण धोक्यात आहे म्हणून येणारी विधानसभा निवडणूक ही मोठ्या ताकतीने व जोमाने  लढायची आहे तसेच ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे जो उमेदवार देतील तो उमेदवार सर्वांनी मिळून मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचा आहे  त्या साठी सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या ताकतीने व जोमाने कामाला लागायचे आहे असे या बैठकीत ठरविण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष बाबासाहेब विठ्ठल मस्के,बीड जिल्हा उपाध्यक्ष धनराज सोनवणे,अमोल हजारे, शरद धीवार,आनेराव, अर्जुन गायकवाड,अर्जुन शिंदे,अंकुश वाघमारे, भारत गायकवाड,सचिन गायकवाड,सुरजआरकडे, प्रवीण मस्के,दीपक वाघमारे,त्रिंबक वायकर, गणपती वायकर,परमेश्वर धेंडे,सुमित धनवे,तानाजी शिनगारे,सुमंत सांडवे, लक्ष्मण जानराव यांच्या सह वंचित बहुजनआघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments