Type Here to Get Search Results !

येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत परशुराम आर्थिक विकास महामंडळ प्रस्ताव घेणार संघर्षसमिती सोबत च्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

 येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत परशुराम आर्थिक विकास महामंडळ प्रस्ताव घेणार संघर्षसमिती सोबत च्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन 



केज/प्रतिनिधी  


समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती मागील अनेक वर्षांपासून सातत्याने ब्राह्मण समाजा च्या प्रश्नासाठी सरकार समोर आंदोलन निवेदन धरणे आमरण उपोषण असे करत असल्यामुळे मागील ७०-७५ वर्षात तीन वेळा मुख्यमंत्री महोदया सोबत बैठक घेण्यात आल्या.या तिन्ही बैठकीत ब्राह्मण समाजाचे प्रश्न सरकार समोर मांडले व वेगवेगळ्या मागण्या ठेवल्या व काही मान्य झाल्या.दि.३ सप्टेंबर २०२४ रोजी संघर्ष समिती च्या सोबतच्या बैठकीत ब्राह्मणसमाजाची प्रलंबित मागणी परशुराम आर्थिक विकास महामंडळ येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकी त प्रस्ताव घेऊ व सुरवातीला थोडे बजेट टाकू असे आश्वासन उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले तसेच अमृत ही शिक्षण व प्रशिक्षण संस्था पण काम करेल असे सांगितले.यावेळी उपोषण कर्ते दिपक रननवरे, धनंजय कुलकर्णी,श्रीकांत जोशी सह संघर्ष समिती उपस्थित होती.दि.१ सप्टेंबर २०१८ केज पासून संघर्ष समितीचा सामाजिक लढा सुरु झाला.केज येथे धरणे आंदोलन २८ आक्टोबर २०१८ मोटार सायकल मोर्चा,२२जानेवारी २०१९ आझाद मैदानावर धरणे आंदोलन ३आॕगस्ट २०१९ आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन दि.२२ जानेवारी २०२० बीड जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन २२ जानेवारी २०२१ छञपती संभाजीनगर विभागीय  आयुक्त कार्यालयासमोर पळी ताम्हणं वाजवून आंदोलन अनेक ठिकाणी पळी ताम्हणं आंदोलन झाले २०२२ मध्ये अंबाजोगाई येथे आमरण उपोषण ठरले.नंतर २८ नोव्हेंबर २०२३ला जालना येथे आमरण उपोषणकेले सरकारने १४ डिसेंबर २०२३ला नागपूर अधिवेशनात परशुराम आर्थिक विकास जाहीर केले.परंतु आठ महिने वाट पाहून काहीच कारवाई न झाल्यामुळे दि.१५आॕगस्ट २०२४ ला पुन्हा आमरण उपोषण केले.दि.२२ आॕगस्ट २०२४ ला उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन वरून उपोषण सोडवुन दि.३ सप्टेंबर २०२४ रोजी बैठक लावली.सह्याद्री अतिथी गृह येथील या बैठकीस समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे शिष्टमंडळ उपस्थित राहिले.यामध्ये दिपक रननवरे,धनंजय कुलकर्णी,श्रीकांत जोशी, मकरंद कुलकर्णी,अशोक वाघ,श्याम कुलकर्णी,अॕड. पोतदार राजेंद्र,विजया अवस्थी,दीपाली देशपांडे, अर्चना सरुडकर,श्रीधर गुरु,अॕड.नाईक बळवंत, आर,जे.देशमुख,स्वप्नील  पिंगलकर,व नायब तहसीलदार सोनवणे हे उपस्थित होते.उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या सोबत मंत्री अतुल सावे,चंद्रकांत दादा पाटील व संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी समाजाच्या मागण्या दिपक रननवरे यांनी मांडल्या तसेच मकरंद कुलकर्णी,विजया अवस्थी व इतरांनी समाजाच्या मागण्या मांडल्या यावेळी समाज भावना लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीतप्रस्ताव मंजूर करून पंधरा दिवसात थोडा निधी देऊन कार्यान्वित करू असे आश्वासन दिले तसेच इतर मागण्या देखील टप्प्या टप्प्याने मंजूर करू असे आश्वासन दिले.यावेळी संघर्ष समितीच्या काही मागण्या मान्य केल्याबद्दल आभार देखील मानले.

बैठक अतिशय सकारात्मकपणे पार पडली.

Post a Comment

0 Comments