Type Here to Get Search Results !

केज तालुक्यातील कुंबेफळ ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम आणि जिल्ह्यात तृतीय, संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानात मिळवले ३ लाख ६० हजार रुपयांचे बक्षीस.

 केज तालुक्यातील कुंबेफळ ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम आणि जिल्ह्यात तृतीय, संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानात मिळवले ३ लाख ६० हजार रुपयांचे बक्षीस.



केज/प्रतिनिधी 


संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२३-२४अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत कुंबेफळ ग्रामपंचायतने जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक पटकावला आहे.

जिल्हास्तरीय तपासणी साठी प्रत्येक जिल्हा परिषद गटातुन एक गाव निवडले जाते व त्यापैकी प्रत्येक तालुक्यातून एका गावाची निवड केली जाते. 

जिल्हास्तरीय तपासणी साठी केज तालुक्यातून कुंबेफळ यागावाची निवड झालेली होती.सदर स्पर्धेच्या अनुषंगाने दि १९ जुलै रोजी जिल्हास्तरीय पथका मार्फत तपासणी करण्यात आली होती.बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संगितादेवी पाटील मॅडम यांनी नुकताच या स्पर्धेचा निकाल घोषित केला आहे.यामध्ये कुंबेफळ गावाला जिल्ह्या तून तृतीय क्रमांकमिळाला आहे.आता लवकरच या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न होईलआणी तो दिवस कुंबेफळच्या प्रत्येक नागरिकांसाठी अभिमानाचा असेल.

अतिशय कमी वेळेत या स्पर्धेच्या तयारीसाठी गावातील सर्व नागरिक, प्रतिष्ठित मंडळी,ग्राम पंचायत कार्यालयाचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी, गावातील तरुण मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, गावातील दोन्ही शाळेचे शिक्षकवृंद व विद्यार्थी व अंगणवाडी सेविका, आरोग्य उपकेंद्राचे सर्व कर्मचारी व आशाताई तसेच गावाशी संबंधित सर्व कर्मचारी यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केल्यानेच हा बहुमान मिळाला असून सर्वांचे ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचे आभार मानले आहेत.तसेच या दरम्यान स्पर्धेला कसे सामोरे जावे यासाठी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व सर्व कर्मचारी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले तसेच मस्साजोगचे आदर्श सरपंच श्री.धनंजय देशमुख यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.त्याच बरोबर कुंबेफळ गावचे पाणी पुरवठा विभाग मुंबई येथे कार्यरत असलेले आशिष थोरात यांनी दिलेल्या सूचना आणि केलेले मार्गदर्शन हे या यशस्वी टप्प्यावर कामी आले. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सर्वांना धन्यवाद दिले आहेत.

Post a Comment

0 Comments