Type Here to Get Search Results !

पुरोगामी पत्रकार संघ सलग्न कला क्रीडा विश्व समितीच्या तालुका अध्यक्षपदी अनिल वैरागे यांची निवड. कलाकारांना न्याय हक्क मिळवून देण्या करिता सदैव सक्षम. -अनिल वैरागे

 पुरोगामी पत्रकार संघ सलग्न कला क्रीडा विश्व समितीच्या तालुका अध्यक्षपदी अनिल वैरागे यांची निवड. 

कलाकारांना न्याय हक्क मिळवून देण्या करिता सदैव सक्षम. -अनिल वैरागे




केज/प्रतिनिधी


पत्रकारांच्या न्याय, हक्कासाठी लढणाऱ्या पुरोगामी पत्रकार संघाशी सलग्न असलेल्या कला क्रीडाविश्व समितीची केज तालुका कार्यकारिणी निवडीची बैठक केज येथील विश्रामगृहावर राज्याचे प्रसिध्दी प्रमुख दत्तात्रय मुजमुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.पुरोगामी पत्रकार संघ सलग्न कला क्रीडा विश्व समितीच्या केज तालुकाध्यक्षपदी अनिल वैरागे यांची तर तालुका उपाध्यक्ष पदी दिलीप खाडे,सचिन लांडगे सचिव,मुनीर भाई कुरेशी सहसचिव,बलभीम मस्के   सल्लागार,शेख इकबाल सहसल्लागार,प्रदीपहजारेशहरअध्यक्ष अनुज रोकडे शहर सचिव,किशोर भांडे संघटक,शेख चुन्नुमिया सहसंघटक,दीपक खाडे  सदस्य शिवमुर्ती हजारे सदस्य यांच्या निवडी करण्यात आल्या.तसेच महिला आघाडी तालुका अध्यक्षपदी पूजा घाडगे, सिंधुताई मुळे महिला संघटक,अनिता कसबे   शहराध्यक्ष,छबू अंधारे शहर संघटकपदी निवड पत्र देऊन निवडीकरण्यात आल्या.यावेळी पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य प्रसिध्दी प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मुजमुले,तालुकाध्यक्ष रंजीत घाडगे,सचिव दिनकर जाधव,उपाध्यक्ष मनोराम पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments