Type Here to Get Search Results !

मराठा समाजाचा केज मध्ये कडकडीत बंद, उपोषणाची तात्काळ दखल घेण्याची मागणी.

 मराठा समाजाचा केज मध्ये कडकडीत बंद, उपोषणाची तात्काळ दखल घेण्याची मागणी.



केज/प्रतिनिधी 


मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील हे मागच्या चार दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे सातव्यांदा उपोषणाला बसलेले आहेत.मात्र मागच्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चालल्याने संपूर्ण सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे आणि याचाच एक भाग म्हणून सरकारने तात्काळ उपोषणाची दखल घ्यावी यासाठी बीड जिल्हाबंदची हाक दिली होती.त्यानुसार केज शहरात देखील कडकडीत बंद ठेवण्यात आला होता.मागच्या एक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करत आहेत.सकल मराठा समाजाचा त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबाही मिळत आहे.मात्र अद्याप पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्याने मनोज जरांगे हे अंतरवाली सराटी येथे मागच्या चार दिवसांपूर्वी उपोषणाला बसलेले आहेत.दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे आणि त्यांनी उपचार घेण्यासही नकार दिलेला आहे. दरम्यान,सकल मराठा समाजाच्या वतीने ठिक ठिकाणी बंदचे आवाहन करण्यात आले.आज दिनांक २१ सप्टेंबर२०२४ रोजी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार केज मध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला आणि सरकारने उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी असे निवेदन देण्यात आले.प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार आशा वाघ यांनी निवेदन स्वीकारले.यावेळी मोठ्या प्रमाणावर सकल मराठा समाजाची उपस्थितीहोती.

पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments